‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील अंतरा, मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण व सौरभ चोघुले लग्न झाल्यापासून खूप चर्चेत आहेत. ३ मार्चला योगिता व सौरभ यांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. दोघांनी लग्नाचा फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मालिकेतील अंतरा, मल्हारची हिट जोडी वास्तवात लग्नबंधनात अडकतील, याची कोणीच कल्पना केली नव्हती. त्यामुळे योगिता व सौरभ खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी झाल्याच वाचून अनेकांना धक्का बसला होता. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ अजूनही व्हायरल होतं आहेत.

योगिता व सौरभचा मोठ्या धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला होता. हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळाचा दोघांचा झाला. सध्या दोघं सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. नुकताच योगिताने संगीत सोहळ्यातील एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – राखी सावंतने दुसऱ्या पत्नीला दिलेला सल्ला ऐकून भडकला आदिल खान, म्हणाला, “ती करोना व्हायरस…”

या व्हिडीओत, योगिता अमृता खानविलकरचं लोकप्रिय गाणं ‘चंद्रा’वर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या साथीला प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील पाहायला मिळत आहे. दोघं खूपच छान ‘चंद्रा’ गाण्याची हूक स्टेप करताना दिसत आहेत.

हेही वाचा – लग्नानंतर सिद्धार्थ चांदेकरमध्ये काय बदल झाले? म्हणाला, “मला अपयशी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगिता व आशिष हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सुपर’, ‘फायर’, ‘सुपर से उपर’, ‘कडक’ अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.