अभिनेता विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. युट्यूब ट्रेंडिंगमध्ये नंबर वनवर असलेल्या या गाण्यानं अक्षरशः सगळ्यांना वेड लावलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यातील विकी कौशलने केलेल्या हूकस्टेपने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. विकीच्या हूकस्टेपचं खूप कौतुक होतं आहे. सलमान खानपासून ते हृतिक रोशनपर्यंत अशा बॉलीवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्कीचं कौतुक केलं होतं. सध्या ‘तौबा तौबा’ या गाण्यावर अनेकजण डान्स व्हिडीओ करताना दिसत आहेत. ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणनेही विकीच्या या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. योगिताचे हे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. अशातच तिने सध्या ट्रेंड होत असलेल्या विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर डान्स केला आहे.

हेही वाचा – “माझा पती मुस्लिम असूनही प्रामाणिक…”, देवोलीना भट्टाचार्जीने पायल मलिकला दिलं प्रत्युत्तर, म्हणाली, “बहुपत्नीत्वासारख्या…”

या व्हिडीओत, योगिता ‘तौबा तौबा’ गाण्यातील हूकस्टेप खूप सुंदररित्या करताना दिसत आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ चाहत्यांना आवडला असून त्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप छान डान्स”, “मस्त आहे”, “तू खूप छान परफॉर्म करते”, “उत्कृष्ट”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी योगिताच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील परफॉर्न्ससाठी बादशाहने घेतलं ‘इतकं’ मानधन, बॉलीवूड सेलिब्रिटींसह पंड्याही थिरकला रॅपरच्या गाण्यांवर

हेही वाचा – Video: नाच गो बया…,पूजा सावंतचा नऊवारी साडीत जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, योगिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘जीव माझा गुंतला’ नंतर ती कुठल्याही मालिकेत झळकली नाही. पण मालिका संपल्यानंतर काही महिन्यांनी तिने सौरभ चौघुलेबरोबर लग्न केल्याचं जाहीर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. ३ मार्च २०२४ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर काही महिन्यांनी योगिता व सौरभ एका गाण्यामध्ये पाहायला मिळाले. जूनच्या पहिल्या आठवड्यात दोघांनी स्वतःच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला.