‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या लोकप्रिय मालिकेने सप्टेंबर महिन्यात अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेनंतर अंतरा-मल्हारची देखील मालिका ऑफ एअर झाली. यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं.

२१ जून २०२१ रोजी सुरू झालेल्या ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलं होतं. मालिकेतील अंतरा-मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. पण काही महिन्यांपूर्वी मालिकेचा ट्रॅक कंटाळवाणा झाल्यामुळे टीआरपीवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे तेव्हापासून ‘जीव माझा गुंतला’ मालिका बंद होणार अशी चर्चा सुरू झाली. अखेर १६ सप्टेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. आता या मालिकेतील मल्हार पुन्हा एकदा प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: इशाने ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता एल्विश यादवलाही दिलाय धोका?; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

मल्हार म्हणजे अभिनेता सौरभ चौघुले ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत तो एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सौरभला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

हेही वाचा – सोनाली कुलकर्णीच्या आई-वडिलांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण: झळकणार ‘या’ चित्रपटात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सुंदरी’ या मालिकेचा नवा प्रवास सुरू झाला आहे. या मालिकेत सौरभबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात सुद्धा झळकणार आहे. याचा प्रोमो नुकताच ‘सन मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये वनिताचा डॅशिंग अंदाज दिसत आहे.