कलर्स वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील मल्हार-अंतराची जोडीही प्रेक्षकांना भावली. या मालिकेत मल्हार ही भूमिका अभिनेता सौरभ चौगुले साकारत आहे. तर अभिनेत्री योगिता चव्हाण अंतराच्या भूमिकेत आहे.

योगिता नुकताच एक शूटिंगदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. योगिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ सेअर करत याबाबत भाष्य केलं आहे. हा व्हिडीओ जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवरील असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये योगिता व्हॅनिटी वॅनमधून खाली उतरताच चाहत्यांना तिच्याभोवती घोळका केला. त्यानंतर चाहत्यांनी तिच्याबरोबर सेल्फीही काढले.

हेही वाचा>> “नवरा-बायकोमधील संवाद…” प्रिया बापटने शेअर केलेल्या व्हिडीओने वेधलं लक्ष

हेही वाचा>>लग्नानंतर रात्रीच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटला घेऊन गेला अन्…; फोटो व्हायरल

चाहत्यांचं प्रेम पाहून योगिता भावरून गेल्याचं दिसत आहे. तिने या व्हिडीओला ‘प्रेम’ असं कॅप्शन देत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सही केल्या आहेत. कलाकारांवर चाहते भरभरुन प्रेम करत असल्याची प्रचिती या व्हिडीओतून येत आहे.

हेही वाचा>> Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जीव माझा गुंतला’ मालिकेने योगिताला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत ती रिक्षा चालवताना ही दिसते. योगिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.