This Bollywood Actress kept Her Marriage Under Wraps. : अनेकदा अभिनेत्रींना लग्नानंतर किंवा मूल झाल्यानंतर करिअर संपण्याची भीती असते. असं बऱ्याचदा काही अभिनेत्री मुलाखतींमध्ये सांगताना दिसतात. अशातच ९० च्या काळात अनेक चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीनंही तिचं लग्न झाल्याची बातमी गुपित ठेवली होती.

९० च्या काळात सोशल मीडिया नसल्यानं कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येकाला तितकी माहिती नसायची. त्यामुळे कोणी लग्न केलं, तर त्यांनी त्याबाबत सांगितल्याशिवाय कुणाला काही कळायचं नाही. तर काही लोक ही गोष्ट गुपितही ठेवायचे. असं म्हटलं जातं की, अभिनेता गोविंदानंही त्याचं लग्न झाल्याची बातमी गुपित ठेवली होती. त्याप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला हिनंसुद्धा तिच्या लग्नाबद्दल कोणाला सांगितलं नव्हतं.

जुही चावलानं १९८८ रोजी आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यामध्ये तिच्यासह आमिर खान झळकलेला. त्याचाही हा पहिलाच चित्रपट होता. अभिनेत्रीनं पुढे १९९५ मध्ये उद्योगपती जय मेहता यांच्याशी लग्न केलं. जय मेहता यांचं हे दुसरं लग्न होतं. १९९० मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी सुजाता बिरला यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं होतं. सुजाता बिरला या उद्योगपती यश बिरला यांच्या बहीण होत्या. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पाच वर्षांनी जय यांनी दुसरं लग्न केलं.

जुही चावलानं सुरुवातीला तिच्या लग्नाची बातमी गुपित ठेवली होती. राजीव मसंद यांच्याशी संवाद साधताना तिनं जय यांनी तिची कशी काळजी घेतली आणि जय यांच्या आईंनी म्हणजे जुही यांच्या सासूबाईंनी त्यांना कसा पाठिंबा दिला याबद्दल सांगितलेलं. त्यादरम्यानच जुहीला लग्न गुपित ठेवण्याबद्दल विचारण्यात आलेलं.

लग्न गुपित ठेवण्याबद्दल जुही चावलाची प्रतिक्रिया

जुही चावला त्याबद्दल म्हणाली, “पूर्वी प्रत्येक जण असं करायचा. तेव्हा इंटरनेट नव्हतं आणि फोनला कॅमेराही नव्हता. त्यामुळे हे सोपं जायचं. त्यावेळी मी इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करू पाहत होते आणि काही चांगल्या चित्रपटांत काम करीत होते. जेव्हा मी जयबरोबर लग्न केलं तेव्हा मला वाटलं की, आता माझं करिअर संपणार. त्यादरम्यान माझ्या आईचंही निधन झालं आणि त्यावेळी मी सगळंच गमावत आहे, असं मला वाटतं होतं.”

जय मेहतांबरोबरच्या नात्याबद्दल जुही म्हणाली, “इंडस्ट्रीतील कारकिर्दीला सुरुवात होण्यापूर्वीच त्या जय यांच्यासह रिलेशनशिपमध्ये होत्या. इंडस्ट्रीत पदार्पण झाल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. तेव्हा अभिनयातील करिअरवर ती लक्ष केंद्रित करत होती. नंतर एकदा एका डिनर पार्टीला तिची जय यांच्याशी भेट झाली. त्यानंतर त्यांचा संपर्क वाढला आणि ते जुहीला फुलं व पत्र पाठवत असत. वर्षभरानंतर जय यांनी प्रपोज केल्यानंतर जुहीनंही होकार दिला.

आईच्या निधनाबद्दल जुही चावला म्हणालेली की, लग्नापूर्वीच त्यांच्या आईचं निधन झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी करिअर थांबवण्याचा निर्णय घेतला. जुही म्हणालेली, “माझे पती, माझ्या सासरचे सर्व मंडळी विशेषकरून माझ्या सासूबाई यांनी माझी खूप काळजी घेतली. माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या की, मी त्यांना मुलीसारखीच आहे. तुला ज्यानं आनंद मिळतो ते कर. त्यांनी मला काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं.”

‘दूरदर्शन सह्याद्री’शी संवाद साधताना जुही म्हणालेली की, तिचं लग्न खूप थाटामाटात होणार होतं आणि अनेकांना त्यासाठी आमंत्रित करण्यात येणार होतं; परंतु तसं काही घडलं नाही. आईच्या निधनानंतर जुही चावला खूप दु:खात होत्या. त्यांना त्यांचं करिअर संपणार याचीही भीती वाटायची. बऱ्याचदा लग्न झाल्यानंतर अभिनेत्रींना ही भीती सतावत असते. परंतु, त्यावेळी जुहीच्या सासूबाईंनी तिला खूप पाठिंबा दिला. त्यांनी लग्नासंबंधीचं सर्व नियोजन रद्द करून जुहीच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी केल्या.

जुही चावलानं तिच्या धाकट्या भावाच्या निधनाबद्दलही सांगितलेलं. (brain haemorrhage) हा आजार झाल्यानंतर अनेक दिवस तिचा भाऊ कोमामध्ये होता. त्यावेळी ती तासन् तास रुग्णाल्यात असायची. पुढे अभिनेत्रीच्या भावाचं निधन झालं. भावाच्या निधनानंतर अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यामुळे तिनं अशी इच्छा व्यक्त केलेली की, कोणाच्याही वाट्याला असं दु:ख येऊ नये.