सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात शिवानी सुर्वे, तितीक्षा तावडे, प्रथमेश परब, पूजा सावंत अशा अनेक कलाकारांनी लग्न केलं. आता लवकरच आणखी एक मराठी अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. नुकतंच या अभिनेत्याचं मराठी कलाकारांनी केळवण केलं.

‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम अभिनेता कौस्तुभ दिवाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा किर्ती कदम हिच्याशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. सध्या दोघांची लग्नघाई सुरू आहे. अशातच मराठी कलाकारांनी कौस्तुभ व किर्तीचं केळवण केलं. याचे व्हिडीओ आणि फोटो कौस्तुभने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या शूटिंगला कोकणात सुरुवात, कलाकारांचा व्हिडीओ आला समोर

अभिनेत्री, लेखिका, शिल्पा नवलकर, मेघा धाडे, शाल्मली टोळ्ये, स्वप्नाली पाटील, राजन ताम्हणे, आस्ताद काळे यांनी आपल्या कुटुंबासह कौस्तुभ व किर्तीचं केळवण केलं. १८ मार्चला हा केळवणाचा कार्यक्रम झाला. अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओ, फोटोमध्ये शिल्पा, मेघा, शाल्मली, स्वप्नाली या कौस्तुभ व किर्तीचं औक्षण करताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – “…तर मला अटक करा”, तीन दिवसांपूर्वी पुन्हा बाबा झालेले सिद्धू मुसेवालाचे वडील असं का म्हणाले? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कौस्तुभच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो बऱ्याच मालिका, चित्रपटांमध्ये झळकला आहे. ‘बंध रेशमाचे’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे!’, ‘तुजं माजं सपान’ अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. कौस्तुभ हा अभिनयासह संवाद लेखन देखील करतो. दरम्यान, कौस्तुकने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.