रिअॅलिटी शो स्टार आणि अभिनेता करण कुंद्रा त्याच्या लव्ह लाईफमुळे अनेकदा चर्चेत असतो. तो ‘बिग बॉस’ १५ ची विजेती आणि ‘नागिन’ फेम तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे. त्याच्या प्रेयसीबद्दलचा आदर पाहून चाहते त्याला खूप पसंत करतात. दोघांचं बाँडिंगही चर्चेचा विषय असतं. अशातच पुन्हा एकदा करणच्या एका कृतीची चर्चा होत आहे. सध्या करण ‘इश्क में घायल’ या सुपरनॅचरल शोच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Video: आदिल खान तुरुंगात गेल्यानंतर राखी सावंतने शेअर केला रील; म्हणाली, “माझ्या जवळच्याच…”

अलीकडेच करणने एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्याने अजानचा आवाज ऐकला आणि सर्वांना शांत होण्यास सांगितले आणि स्वतःही शांत झाला. तो म्हणाला की अजान सुरू आहे, त्यामुळे सर्वांनी दोन मिनीट शांत राहा. अजान झाल्यानंतर करणने पत्रकार परिषद पुन्हा सुरू केली. त्याच्या या कृतीचं त्याचे चाहते कौतुक करत आहेत. तसेच करण प्रत्येक धर्माचा आदर करतो, असंही चाहते म्हणत आहेत. करणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करण त्याच्या आगामी शो ‘इश्क में घायल’ मध्ये वेअरवॉल्फच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोच्या एका एपिसोडसाठी करणने तब्बल १२ लाख रुपये फी आकारल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, त्याच्याबरोबर या शोमध्ये मराठमोळा गश्मीर महाजनी आणि रीम शेख मुख्य भूमिकेत दिसतील.