करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजन विश्वासातील क्यूट जोडी म्हणून ओळखली जाते. ‘बिग बॉस सीझन १५’च्या घरात झालेल्या या जोडीचे कोट्यावधी चाहते आहेत. करण-तेजस्वीचे व्हिडीओ व फोटो नेहमी चर्चेचा विषय असतात. पण नुकताच दोघांचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे; ज्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत; दिसणार ‘या’ भूमिकेत

जीके (इनअ‍ॅक्टिव्ह) या ट्वीटर हँडलवरून करण-तेजस्वीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये करण तेजस्वीला आंटी म्हणून हाक मारताना दिसत आहे. हेच नेटकऱ्यांना खटकलं असून ते करण-तेजस्वीला ट्रोल करत आहेत.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “मी याच्यासारखा शोऑफ करणारा माणूस कधी पाहिलाच नाही. हा खूप वाईट आहे. तेजस्वी आंटी हाक मारतो. मज्जेत जरी असलं तरी असं का बोलायचं?” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “सर्वात पहिल्यांदा मी तेजस्वीसाठी प्रार्थना करते. तू करणबरोबर असलेलं रिलेशनशिप ब्रेकअप कर. ३९ वर्षांचा असलेला हा (अंकल) काका ९ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंड तेजूला आंटी (काकी) हाक मारतो. देव तुला याच फळ देईल. तेजू तू यापुढे याला केके काका म्हणून हाक मार प्लिज.” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच करणने शेअर केलेल्या एका फोटोवरून त्यांचा ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण टाइम्स नाउच्या मुलाखतीमध्ये करणनं याबाबत बोलून चर्चांना पूर्णविराम दिला. करण म्हणाला होता की, “सोशल मीडियावर माझी पोस्ट पाहून नेटकरी चुकीचे तर्क-वितर्क लावत आहेत. शिवाय वाईट प्रतिक्रिया देत आहेत. पण सोशल मीडियावर कोणाच्या खऱ्या आयुष्याविषयी दाखवतं नाही.”