छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोच्या १५ व्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. यावर्षीहीबॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. बिग बी मोठ्या विनम्रतेने आणि दिलखुलास अंदाजात संवाद साधत असतात. त्यासोबत बिग बी हे या कार्यक्रमात विविध रंगीबेरंगी कपडे परिधान करताना दिसतात. नुकतंच यंदा त्यांच्या पोशाखात काय नवीन असणार आहे, याची माहिती समोर आली आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या शोला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे विशेष महत्व प्राप्त झालं आहे. या कार्यक्रमाच्या आगामी पर्वात बिग बींना फॅशन ट्रेंडनुसार त्यांना शोभतील असे स्टायलिश कपडे दिले जाणार आहेत. प्रसिद्ध स्टायलिस्ट प्रिया पाटील या बिग बींच्या कपड्यांचे डिझाईन करणार आहेत. केबीसी कार्यक्रमाच्या १५ व्या पर्वासाठी अमिताभ बच्चन यांच्या लूकमध्ये थोडा बदल करण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्या कपड्यांचा क्लासिक लूक जसाच्या तसा ठेवून नवीन ट्रेंडीग लूक देण्यात येणार आहेत.
आणखी वाचा : “…दिग्पाल काका चुकला”, ‘पावनखिंड’ पाहिल्यानंतर चिन्मय मांडलेकराच्या लेकाने दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेला “बाजीप्रभू…”

यासाठी आम्ही बिग बींना उत्कृष्ट थ्री पीस सूट, बंद गळ्याचे सूट आणि जोधपुरी सूट देणार आहोत. त्याबरोबरच ते विविध रंगसंगतीचे कपडे परिधान करतानाही दिसणार आहेत. यात बिग बी अधिकच खुलून दिसतील, अशी खात्री प्रिया पाटील यांना आहे. विशेष म्हणजे यंदा त्यांच्या कोटच्या कॉलरमध्ये कॉन्ट्रास्ट पायपिन, उठावदार ब्रोचेस आणि लेपल पिनचा वापर केला जाणार आहे. यामुळे त्यांचा लूक परिपूर्ण आणि भारदस्त दिसेल. तसेच त्यांच्या या लूकमध्ये जोधपुरीबरोबरच खास शाल आणि त्याला साजेसा ब्रोच लावण्यात येणार आहे.

मी अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहून खूप काही शिकले आहे. ते खरंच खूप महान आहेत. त्यांचे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष असते. त्यांच्याकडूनच मी हा गुण घेतला आहे. मी नेहमीच सगळ्यांना सांगते की सरांना स्टायलिस्टची गरज नाही, ते स्वतःच एक स्टाईल आयकॉन आहेत. पोशाख माणसाला घडवत नाही, तर माणूस पोशाख घडवतो. ते जे परिधान करतात तोच ट्रेंड बनतो. त्यामुळे ते सर्व पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात, असे प्रिया पाटील म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्या ‘कौन बनेगा करोडपती’चं पहिलं पर्व २००० साली प्रसारित झालं होतं. तेव्हापासून प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमाच्या यादीत ‘कौन बनेगा करोडपती’ पहिल्या नंबरवर आहे. या शोचं फक्त तिसरं पर्व शाहरुख खाननं होस्ट केलं होतं. बाकी सर्व पर्व अमिताभ बच्चन आपल्या अंदाजात होस्ट करत आहेत.