सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे प्राणीप्रेमी आहे. अनेक कलाकारांना प्राण्यांची खूप आवड आहे. सध्या अनेक कलाकारांच्या घरात एक तरी श्वान किंवा मांजर पाहायला मिळतात. ते त्यांचे विविध फोटोही शेअर करताना दिसतात. नुकतंच मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या दोन पाळीव श्वानांबद्दल लिहिले आहे.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे मयुरी देशमुख ही प्रसिद्धीझोतात आली. दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीने आत्महत्या करत जीवन संपवलं. पती आशुतोष भाकरेच्या निधनानंतर मयुरी ही त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता मयुरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “कोणीतरी टाकलेल्या घाणीतूनही…” पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Mobile thieves arrested 30 mobiles seized in kandivali
मुंबई : सराईत मोबाइल चोरांना अटक, ३० मोबाइल हस्तगत
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत

“माझ्या बाळांनो, तुम्ही देत असलेल्या अतुलनीय प्रेमाच्या बदल्यात मी तुम्हाला फक्त एक आनंदी जीवन देऊ शकते. एखादा श्वान तुमच्या घरात किंवा पलंगावर असावा, असं मला कायमच वाटतं. प्रत्येक श्वानाचे केस गळतात असं नाही. ते प्रेम आणि आनंदाचे जादुई तंतू असतात. पण श्वानांच्या केसांचा तिरस्कार करणाऱ्यांना त्याचा आनंद कधीच अनुभवता येत नाही”, अशी पोस्ट मयुरी देशमुखने केली आहे.

मयुरी देशमुख ही प्राणीप्रेमी आहे. तिच्याकडे दोन श्वान आहेत. ती कायमच त्यांची काळजी घेताना दिसते. अनेकदा ती तिच्या श्वानांचे फोटोदेखील शेअर करत असते.

आणखी वाचा : ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकाचे प्रयोग अचानक रद्द, कारण उमेश कामतला…

दरम्यान मयुरी देशमुखने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत झळकली होती. यात तिने मानसी देशपांडे ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळेच ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने ‘३१ दिवस’, ‘ग्रे’, ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटात काम केले. तसेच ती ‘जून जुलै’, ‘प्लेझंट’ ‘सरप्राईज’, ‘डिअर आजो’, ‘तिसरे बादशाह हम’ या नाटकातही झळकली होती.