‘बिग बॉस मराठी’चं चौथ्या पर्वाची सर्वाधिक चर्चा रंगली. अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. ‘बिग बॉस’च्या घरातील काही सदस्य सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले. त्यातीलच एक सदस्या म्हणजे किरण माने. किरण यांनी उत्तम खेळी खेळत टॉप तीनमध्ये स्थान मिळवलं. थोडक्यात ते ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीपासून दूर राहिले. आता त्यांनी शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ

Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
A unique wedding invitation card from Pune encouraged citizens to exercise their voting rights
लग्नपत्रिका नव्हे! या हटके पत्रिकेतून केली लोकांना मतदान करण्याची विनंती, एकदा क्लिक करून नीट पाहाच
Social activist Kiran Verma buys schoolbag for Uber drivers daughter
माणुसकी हाच खरा धर्म! उबर ड्रायव्हरच्या मुलीसाठी विकत घेतली स्कूल बॅग; नेटकरी म्हणाले, ” “जगाला तुझ्या सारख्या माणसांची गरज …”
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण मानेंनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या मैत्रिणीबाबत उल्लेख केला आहे. तसेच तिच्याबरोबरचा फोटोही शेअर केला आहे. मेत्रिणीने पाठिंबा दिला असल्याचंही किरण यांनी म्हटलं आहे.

किरण माने म्हणाले, “मी बिग बॉसच्या घरात असताना सुरेखा कुडची या माझ्या मैतरनीनं मला लै सपोर्ट केला! तिचे आभार मानायला तिच्या सेटवर गेलोवतो. कलर्स मराठीवरच्या ‘शेतकरी नवरा हवा’चं शुटिंग सातार्‍याजवळ चाल्लंय…सगळे कलाकार लै लै लै प्रेमानं भेटले. मज्जा आली. लब्यू सुरेखा.”

आणखी वाचा – Video : आधी म्हटलं दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर नवऱ्याचं अफेअर, आता राखी सावंतने कॅमेऱ्यासमोरचं केलं आदिलला किस, व्हिडीओ व्हायरल

किरण यांची मेत्रीण म्हणजे अभिनेत्री सुरेखा कुडची. किरण ‘बिग बॉस’च्या घरात असताना सुरेखा यांनी त्यांना बराच पाठिंबा दिला. किरण यांना पाठिंबा देण्याबाबत त्यांनी पोस्टही शेअर केल्या होत्या. किरण यांनी ही मैत्री कायम टिकवली आहे. तसेच ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सुरेखा यांची भेट घेतली.