मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने ‘बिग बॉस मराठी’नंतर प्रसिद्धीझोतात आले. ‘बिग बॉस’मध्ये उत्तम खेळी व तल्लख बुद्धीच्या जोरावर त्यांनी घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही दखल घेण्यास भाग पाडले. टॉप ५पर्यंत पोहोचलेल्या किरण मानेंना मात्र तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.

‘बिग बॉस’नंतर किरण मानेंच्या चाहत्या वर्गातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. किरण माने सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. आगामी चित्रपट, प्रोजेक्ट याबाबत ते अपडेट देत असतात. याशिवाय इतरही अनेक गोष्टींबाबत किरण माने पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर अशोक सराफ यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा>> पाकिस्तानच्या बॉर्डरवर झालं ‘बलोच’ चित्रपटाचं शूटिंग, प्रवीण तरडे अनुभव शेअर करत म्हणाले, “रखरखत्या उन्हात मराठे…”

किरण मानेंनी ‘मनोमिलन’ नाटकातील अशोक सराफ यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “काळजात जपाव्यात अशा आठवणी. “अय् किरन्याS… आशोक सराफचा पिच्चर लागलाय. मज्जा. चल बगायला.” मायणीतल्या तंबू थिएटरमध्ये ज्यांना पहात लहानाचा मोठा झालो…अशा अशोकमामांबरोबर पुढे जाऊन काम करेन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांच्यासोबत केलेल्या ‘मनोमिलन’ नाटकातले काही क्षण…,” असं मानेंनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. मानेंची ही पोस्ट चर्चेत असून त्यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> शिव ठाकरे प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट? डेटिंगच्या चर्चांवर खुलासा करत म्हणाली, “तो खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण माने ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात ते हकीमचाचा ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘रावरंभा’ हा चित्रपट येत्या १२ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.