Sana Sayyad Welcomes Baby Girl : ‘कुंडली भाग्य’ फेम लोकप्रिय अभिनेत्री सना सय्यद आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील काही खास फोटो शेअर करून ती आई होणार असल्याची बातमी दिली होती. या अभिनेत्रीने आता गोंडस बाळाला जन्म दिला आहे. लग्नानंतर तीन वर्षांनी सना आई झाली आहे.

सना सय्यदने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करून ती आई झाल्याची बातमी दिली. सना व तिचा पती इमाद शम्सी आता एका गोंडस मुलीचे आई-बाबा झाले आहेत. सनाने मुलीचा जन्म दिला आहे. सनाच्या या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचाVideo: राहा कपूरचा आवाज ऐकलात का? आजीला पाहून खूश झाली आलिया-रणबीरची लेक, म्हणाली…

सना सय्यदची पोस्ट

Sana Sayyad Welcomes Baby Girl
सना सय्यदची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

सना व तिचा पती इमाद शम्सी यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये लग्न केलं. दोघे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. सना सय्यदने गरोदर असल्याने मे २०२४ मध्ये ‘कुंडली भाग्य’ ही मालिका सोडली. नंतर सनाची जागा अद्रिजा रॉयने घेतली. सनाने ‘कुंडली भाग्य’, ‘कुमकुम भाग्य’, ‘दिव्या दृष्टी’, ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘स्पाय बहू’ यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

हेही वाचाVideo: तीन वर्षांपूर्वी नौदल अधिकाऱ्याशी बांधली लग्नगाठ, अभिनेत्री ३७ व्या वर्षी होणार आई, व्हिडीओ शेअर करून दिली Good News

श्रद्धा आर्यानेही दिली गुड न्यूज

‘कुंडली भाग्य’ मधील आणखी एका अभिनेत्रीने गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्री श्रद्धा आर्या लवकरच आई होणार आहे. नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला. श्रद्धा आर्याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर करून गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली. श्रद्धा आर्याने राहुल नागलशी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. श्रद्धा अभिनयक्षेत्रात काम करत आहेत, तर तिचा पती राहुल नौदल अधिकारी आहे.