अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्गही बराच मोठा आहे आणि म्हणूनच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या कुशलच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पोस्टही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडिया पोस्टमधून तो त्याच्या कामाचे तसेच रोजच्या आयुष्यातील गोष्टींचे अपडेट अनेकदा देत असतो. आताही असंच काहीसं घडलं आहे. त्याची एक पोस्ट सध्या इन्स्टाग्रामवर बरीच चर्चेत आहे.

कुशल बद्रिके अनेकदा त्याच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आणि पत्नीबद्दल इन्स्टाग्रामवर लिहत असतो. आताही त्याने आयुष्याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या आयुष्यात माणसं येतात आणि जातात. कालांतराने आपणही त्यांच्याशिवाय जगायला शिकतो आणि आयुष्यात पुढे जात राहतो अशा आशयाची ती पोस्ट आहे.

आणखी वाचा- “मला काही संजूबाबा…”, कुशल बद्रिकेची संजय दत्तबद्दल पोस्ट, निलेश साबळेंचा केला उल्लेख

कुशल बद्रिके पोस्ट-

माणसं आपली असतात आणि नसतातही, जशी ती आपली असण्याची आपल्याला सवय असते, तशीच ती आपली नसल्याची सुद्धा सवय होते हळूहळू. नाही म्हणजे आठवण येते त्यांची, पण आता अगदी पूर्वीसारखं आयुष्य अडत नाही त्यांच्याशिवाय, सवयीने आपण आता दोन चहा, दोन कॉफी सांगत नाही, पावभाजी वर दोन पाव “एक्स्ट्रा” सांगत नाही, “वन बाय टू” चं शेअरिंग “मॅच्युरिटीच्या बेरिंग” मध्ये हरवून गेलय कुठेतरी. फक्त “आपल्याकडून माणसं जशी मागे सुटत जातात ना तसे, आपणही थोडे थोडे मागे सुटत जातो त्यांच्यासोबत”. पण तरीही एक दिवस सगळं नीट होईल ही संभावना रहातेच मनात.
“ राहून गेल्या हाती,
संभावनांच्या वेण्या !
विण गुंफता जीवाची,
तू एकटा केविलवाण्या” !! :-सुकून

आणखी वाचा- “मी खूप नाटक करते पण राजकारण…”, सून ऐश्वर्या रायबद्दल स्पष्टच बोलल्या जया बच्चन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘चल हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून कुशल बद्रिके प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. याच कार्यक्रमातून भाऊ कदम, सागर करांडे, श्रेया बुगडे यांसारख्या अनेक कलाकारांना वेगळी ओळख मिळाली आहे. आता मराठी कलाकारांच्या बरोबरीने बॉलिवूडचे कलाकारही चित्रपटांच्या प्रमाोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसतात.