आज फ्रेंडशिप डे आहे. मित्र-मैत्रिंणीबरोबर नातं आणखी चांगले करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांची मैत्री घट्ट टिकून आहे. अभिनेता कुशल बद्रिकेने फ्रेंडशिप डे निमित्त त्याच्या जवळच्या मित्रांसाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने त्याने आपल्या मित्रांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘सिंधुताई माझी माई’मध्ये दिसणार ‘या’ भूमिकेत

कुशलने त्यांचे जिवाभावाचे मित्र अभिनेता संतोष जुवेकर, अभिनेता अभिजीत चव्हाण आणि दिग्दर्शक विजू माने यांच्यासाठी खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कुशलने लिहिलं आहे “हक्काने ज्यांच्या बरोबर लढता येतं, आणि उगाच ज्यांच्या वर चढता येत…त्या माझ्या मित्रांना ….Happy friendship day”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. दरम्यान कुशल, संतोष आणि अभिजीत चव्हाण यांची स्ट्रगलर साला’ ही वेबसिरीज प्रचंड गाजली होती. या बेवसिरीजचे तीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नेटकऱ्यांनी या वेबसिरीजला भरभरुन प्रतिसाद दिला होता.