छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. या कार्यक्रमात तो आणेकदा स्त्री पात्रही साकारताना दिसतो. तर आता असं एक पात्र साकारताना तो नाचता नाचता स्टेजवरुन थेट खाली पडला.

कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो अनेकदा ‘हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील त्याच्या छोट्या व्हिडीओ क्लिप्स शेअर करत या कार्यक्रमाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढवत असतो. आता नुकताच त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात तो स्त्री पात्राच्या वेषात ‘चंद्रा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

आणखी वाचा : “मराठी चित्रपटांतील विनोदाचा दर्जा…” रितेश देशमुखचं वक्तव्य चर्चेत

कुशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात ‘चला हवा येऊ द्या’च्या आगामी भागात अमृता खानविलकर, सायली संजीव, ऋता दुर्गुळे, रवी जाधव अशी अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावल्याचं दिसत आहे. अमृता आल्यामुळे कुशलने तिच्या ‘चंद्रा’ या गाण्यावर नाचण्याची संधी सोडली नाही. तो अत्यंत एनर्जीने या गाण्यावर नाचला. तर त्याच्याबरोबर स्नेहल शिदमही या गाण्यावर थिरकली. कुशलचा नाच पाहून अमृताही थक्क झाली. तर शेवटी नाचता नचता कुशल स्टेजवरून खाली पडला. पण तो स्टेजवरून खाली पडणं हा त्यांच्या स्कीटचाच एक भाग होता. तो खाली पडल्यावर दोन क्षण सर्वांनाच त्याची काळजी वाटली. कुशल खरोखर पडला असं त्यांना वाटलं. “चंद्रावरचा खड्डा मध्ये आल्याने मी पडलो,” असं म्हणत पुन्हा एकदा कुशल स्टेजवर गेला आणि पुढील स्कीटला सुरुवात केली.

हेही वाचा : “मला पक्की खात्री आहे की श्रेया बुगडे…” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिलं, “अमृता खानविलकर ने केलेला चंद्रा चा डान्स वाटतो तितका सोपा नाही बरं, आमच्या स्नेहल शिदमचा जवळ जवळ “जीव गेला” मला शिकवता शिकवता. शेवटी माझा नृत्याविष्कार बघून अमृताचाही जीव जाता जाता राहिला. एकदा अजय-अतुल यांना प्रत्यक्ष करुन दाखवेनच म्हणतोय माझा डान्स.” आता त्याचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी कुशलच्या एनर्जीची दाद देत आहेत.