मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. हार्दिक जोशी व अक्षया देवधर २ डिसेंबरला विवाहबद्ध झाले. त्याच दिवशी आशय कुलकर्णीने सानिया गोडबोलेसह लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता मराठी कलाविश्वातील आणखी एका अभिनेत्याची लगीनघाई सुरू आहे.

लग्नाची बेडी फेम अभिनेता संकेत पाठकचा नुकताच साखरपुडा झाला आहे. सुपर्णा श्यामसह संकेतने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. आता लवकरच तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. “आणि आम्ही हो म्हणालो. आता पुढील आयुष्याची वाटचाल एकत्र करणार आहोत…कधी, कुठे, केव्हा? लवकरच सांगू” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>>“आमचं कोकणही गेली १२ वर्षे…” समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

हेही वाचा>>Video : जबरदस्ती घास भरवला, डान्स केला; राखी सावंतच्या अंगात आलं भूत, घाबरुन विकास सावंत स्टोअर रुममध्ये लपला अन्… सुपर्णा श्याम एक अभिनेत्री असून तिनेही नाटकात काम केलं आहे. संकेत पाठकच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>>आधी कॉफी डेट अन् आता थेट लॉंग ड्राइव्ह; अक्षया-हार्दिकच्या रोड ट्रिपचा फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेत सध्या ‘लग्नाची बेडी’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तो राघव या मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे. याआधीही त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.