Vivek Sangle Talks About Marriage Says He Is Ready To Tie The Knot : सध्या नवरात्रीनिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कलाकार मंडळीदेखील नवरात्र उत्साहत साजरी करीत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमधून पाहायला मिळतं. अशातच आता यानिमित्त अभिनेता विवेक सांगळेनंही त्याच्या आईसह मुंबईतील मुंबादेवीचं दर्शन घेतलं आहे.
विवेक सांगळे अलीकडेच त्याच्या नवीन घराच्या बातमीमुळे चर्चेत आला. अशातच आता अभिनेत्यानं तो लवकरच प्रेक्षकांबरोबर आनंदाची बातमी शेअर करणार असल्याचं म्हटलं आहे. विवेकनं त्याच्या आईबरोबर नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्याला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावर विवेकनं तो लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे.
विवेक सांगळेची लग्नाबद्दल प्रतिक्रिया
विवेक सांगळेनं नवरात्रीचं औचित्य साधून मुंबादेवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यानं दिलेल्या मुलाखतीत त्याला त्याच्या लग्नाबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “नक्कीच मलाही आवडेल आणि त्यासाठी माझे प्रयत्नही सुरू आहेत. मलाही असंच वाटतं की, पुढच्या वर्षी माझी जोडीदार माझ्यासोबत असेल.” विवेकच्या लग्नाबद्दल त्याच्या आईला पुढच्या वर्षी अजून एक व्यक्ती बरोबर हवी का, असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “हो, पुढच्या वर्षी दोघं जोडीनं दर्शन घेतील.” विवेकनं सांगितल्यानुसार तो लवकरच त्याच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाची आनंदाची बातमी देणार आहे.
विवेक सांगळे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. गेली अनेक वर्षं तो मराठी मालिकाविश्वात सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यामुळे आता अभिनेत्याचा मोठा चाहतावर्गही निर्माण झाला आहे. सध्या तो ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधून पाहायला मिळतोय. त्यातील त्याची व अभिनेत्री मृणाल दुसानिसची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
दरम्यान, विवेकच्या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या त्यामध्ये काव्या-पार्थ आणि जिवा-नंदिनी यांच्यातील नातं बहरताना दिसत असून, दोन्ही जोड्यांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. या मालिकेची प्रेक्षकांमध्ये क्रेझ असून, सोशल मीडियावर यातील अनेक क्लिप्स व्हायरल होत असतात.