‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ८ जुलैपासून सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलं आहे. चार बहिणी आणि एका भावाची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत ‘झी मराठी’चे बरेच जुने आणि लोकप्रिय चेहरे झळकले आहेत. ‘झी मराठी’ची गाजलेली मालिका ‘लागिरं झालं जी’मधील अज्या आणि टॅलेंट म्हणजे अभिनेता नितीश चव्हाण आणि महेश जाधव पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळत आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नितीशने सूर्यादादाची भूमिका, तर महेशने काजूची भूमिका साकारली आहे. या नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऑनस्क्रीन दोघांची मैत्री पाहायला मिळत आहे. आज महेश जाधवचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने नितीशने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – “ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…”, लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…

महेश जाधवचा व्हिडीओ शेअर करत नितीशने लिहिलं आहे, “सतत डे-नाईट काम करणारे ‘महेश जाधव’ यांना वाढदिवसाच्या आणि रात्रीच्या पण शुभेच्छा…मह्या खूप मोठा हो…’टॅलेंट’ साकारून तू तुझं टॅलेंट दाखवलं आहेसच आणि आता ‘काजू’ आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव किती जास्त आहे. हे तू साऱ्या जगाला दाखवून दिलंस मित्रा, असाच तुझा भाव वर्षोनुवर्षे वाढत जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. लव्ह यू.”

हेही वाचा – Bigg Boss 18: अनंत अंबानीच्या लग्नानंतर जगप्रसिद्ध कार्दशियन बहिणी पुन्हा येणार भारतात, सलमान खानच्या शोमध्ये होणार सहभागी?

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अक्षयने रमाला केलं प्रपोज, पण रमाने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महेश जाधवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो अभिनयाबरोबर उद्योग क्षेत्रातही सक्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी महेशने फलटणमध्ये स्वतःचा फूड ट्रक सुरू केला. ‘हॅलो शॉरमा’, असं फूड ट्रकचं नाव आहे. महेश ‘लागिरं झालं जी’नंतर अनेक मालिकांमध्ये पाहायला मिळाला. तसंच त्याने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये काम केलं. याशिवाय तो ‘फकाट’ या चित्रपटातही झळकला.