‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. मालिकेतील वेगळ्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. आता मात्र या रक्षाबंधनानिमित्त प्रदर्शित केलेल्या गाण्यामुळे या मालिकेची चर्चा सुरू आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने या मालिकेतील गाणे इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केले आहे. हे गाणे भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित असून यामध्ये सूर्या आणि त्याच्या चार बहिणी दिसत आहेत.

भावा बहिणीचं नातं स्वर्गाहूनी सुंदर, नात्यांना जोडणारा सण रक्षाबंधन

‘दिस हा सोन्याचा, बंध हा मायेचा रेशमी नात्याचा सण हा आला’, अशी सुरुवात असलेलं गाणं रक्षाबंधनानिमित्त प्रदर्शित केले आहे. या गाण्यात सूर्या दादा आणि त्याच्या बहिणीचं नातं पाहायला मिळत आहे. बहिणींच्या कायम सोबत असणारा भाऊ आणि त्याच्या बहिणींचं सूर्यावर असलेलं प्रेम या गाण्यातून दिसत आहे. नेटकरी देखील या गाण्याचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

हे गाणं शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “भावा बहिणीचं नातं स्वर्गाहूनी सुंदर, नात्यांना जोडणारा सण रक्षाबंधन” अशी कॅप्शन दिली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका बहिण-भावाच्या नात्यावर आधारित आहे. आई नसलेल्या चार बहिणींचा सांभाळ एकटा सूर्या कसा करतो अशा आशयाचे कथानक आहे.

हेही वाचा: “आपल्या समाजात जातीयवाद…”; ‘स्त्री २’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “एकाच विहिरीतून पाणी पिण्याची…”

दरम्यान, मालिकेत काही दिवसांपूर्वी सूर्याच्या सर्वात धाकट्या बहिणीला मासिक पाळी आल्याचा सीन दाखवण्यात आला होता. याची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. नेटकऱ्यांनी मालिकेचे कौतुक करत असे सीन दाखवले पाहिजेत, असे म्हटले होते. इतर मालिकांमध्ये फक्त कटकारस्थान, भांडण इतकेच दाखवले जाते, मात्र मालिकेमध्ये असे विषय दाखवले पाहिजेत असे मत नेटकऱ्यांनी मांडले होते.

याबरोबरच तुळजा आणि सूर्याची जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते. तुळजा ही डॉक्टर असूनदेखील तिचे लग्न एका अशिक्षित मुलाशी लावून दिले जात आहे. मात्र सूर्या आणि तुळजा हे लग्न मोडण्याचा सतत प्रयत्न करताना दिसतात. तुळजावर सूर्याचे प्रेम आहे मात्र तिला दुसरा मुलगा आवडतो. असे असले तरी सूर्या तिला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आता मालिकेत पुढे कोणते वळण येणार, तुळजाचे सत्यजीतबरोबर ठरलेले लग्न कसे मोडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता मालिकेतील या रक्षाबंधनच्या गाण्यावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अनेक नेटकऱ्यांनी भावा-बहिणीचं नातं असं असायला पाहिजे असे म्हटले आहे.