‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. डॅडींनी आपल्या लाडक्या लेकीचं म्हणजे तुळजाचं लग्न रागाच्या भरात सूर्यादादाशी लावलं. त्यामुळे सध्या तुळजा आणि सूर्याच्या लग्नानंतरची गोष्ट पाहायला मिळत आहे. लवकरच दोघांचा गोंधळ होणार आहे. पण या गोंधळात तुळजाचा भाऊ सूर्याला मारण्याचा एक कट रचणार आहे. भावाच्या या कटातून तुळजा सूर्याचा जीव कशी वाचवते? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच दुसऱ्याबाजूला या मालिकेतील कलाकारांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडीओला मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करताना दिसतात. सध्या एक मल्याळम गाणं खूप व्हायरल होतं आहे. याच गाण्यावर काही दिवसांपूर्वी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांनी मजेशीर व्हिडीओ केला होता.

हेही वाचा – Video: मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार केल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी, पुन्हा व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील राजश्री म्हणजेच अभिनेत्री इशा संजयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्या दादा म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण इतर कलाकारांसह मालिकेच्या दिग्दर्शकाला घेऊन डान्स करताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडीओला १७ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून ३२ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे.

‘लाखात एक आमचा दादा’मधील कलाकारांच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेते अविनाश नारकर म्हणाले, “क्या बात है… व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा…कामाबरोबर अशी मजा, मस्ती झालीच पाहिजे सेटवर… “तर अभिनेत्री श्वेता खरातने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तसंच “किती एन्जॉय करतात यार हे सर्व”, “खूप छान डान्स झाला”, “कसला भारी व्हिडीओ आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

Comments
Comments

हेही वाचा – Video: अंकिता, पंढरीनाथने निक्कीची केली हुबेहूब नक्कल, ‘बी’ टीममध्ये रंगली निक्कीच्या चालण्यावरून चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सूर्यादादाच्या चार बहिणीची भूमिका अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समृद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) यांनी साकारली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.