‘लागिरं झालं जी’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता नितीश चव्हाण सध्या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. ८ जुलैपासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नितीश चव्हाणने सूर्यकांत जगताप उर्फ सूर्यादादाची भूमिका साकारली आहे. एक भाऊ आणि चार बहिणी यांच्या भोवती फिरणारी या मालिकेची कथा प्रेक्षकांचा चांगलीच आवडली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच या मालिकेच्या सेटवर नितीश चिंच खाताना पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.

अभिनेता नितीश चव्हाण सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतो. त्याचे डान्स व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. अलीकडेच नितीशने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांबरोबर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळाला. ‘गण बाई मोगरा’ गाण्यावर सगळे डान्स करताना दिसले होते.

हेही वाचा – ‘झुंड’ फेम अंकुश गेडाम दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा झळकणार मोठ्या पडद्यावर, बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात लागली वर्णी

नुकताच नितीशने मालिकेच्या सेटवर चिंच खातानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान नितीश मीठ लावून चिंच खाताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला तुळजा म्हणजेच अभिनेत्री दिशा परदेशी सीनची तयारी करताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “मी जेलमध्ये असताना माझ्या मित्रांबरोबर वडील दारू प्यायचे”, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने स्वतः केला खुलासा, म्हणाली…

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सध्या तुळजाचा लग्नसोहळा सुरू आहे. मुहूर्तमेढ, मेहंदी आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला असून आता हळदीचा कार्यक्रम बाकी आहे. ६ सप्टेंबरला तुळजा लग्नबंधनात अडकणार आहे. पण लग्नसोहळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. डॅडी तुळजाचं लग्न सूर्याशी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वी याचा प्रोमो समोर आला होता.

या प्रोमोमध्ये लग्नमंडपात तुळजाची सर्वजण वाट पाहताना दिसत आहेत. त्यामुळे डॅडींना विचारलं जात की, तुळजाला यायला एवढा उशीरा का लागतोय? तितक्यात सत्यजित डॅडींना फोनवर तुळजा व सूर्याचा व्हिडीओ दाखवून म्हणतो की, ती येणार नाही. यांची पोरगी सूर्याचा हात धरून पळून गेली आहे. पण सूर्या तुळजाचं स्वप्न म्हणजेच तिच लग्न सिद्धार्थबरोबर होण्यासाठी पळवून घेऊन जातो, याची कोणालाच कल्पना नसते. त्यामुळे “पोरीनं आई-पापाचं तोंड काळ केलं”, असं लोकं म्हणू लागतात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तितक्याच सूर्या तुळजाला घेऊन परत लग्नमंडपात येताना दिसत आहे. पण त्यानंतर सूर्याला पाहून तुळजाचा भाऊ त्याला बेदम मारायला सुरुवात करतो. यावेळी सूर्या डॅडींची माफी मागत म्हणतो की, डॅडी चूक झाली. पण डॅडी सूर्याला रागात लाथ मारतात आणि म्हणतात, “आमची इज्जत आमच्यासाठी सगळ्यात मोठी आहे. आता तिच्याशी लग्न करायचं. तू मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांध. हिच तुमची शिक्षा. आता या अक्षदा नाहीत माणूस मेल्यानंतर तोंडात मारायचे तांदूळ आहेत.” त्यानंतर डॅडी तुळज्याचा तोंडात तांदूळ घालतात आणि आमच्यासाठी तुळजा मेली असं सांगून लग्नमंडपातून निघून जातात. यामुळे तुळजाला धक्काच बसतो. डॅडी लग्नमंडपातून निघून तुळजाच्या फोटोला हार घालतात आणि तिच्या नावाची अंघोळ करताना दाखवलं आहे.