Lakshmi Niwas Fame Actor Buys New Car : ‘लक्ष्मी निवास’ मालिका पहिल्या दिवसापासून घराघरांत लोकप्रिय झाली आहे. यामधील दळवी कुटुंबीय मध्यमवर्गीय दाखवल्याने प्रत्येकाला ही मालिका पाहताना आपलेपणाची भावना जाणवते. या मालिकेतील लक्ष्मी आणि श्रीनिवास यांचं हक्काचं घर बांधायचं स्वप्न असतं. आता या जोडप्याचं हक्काच्या घराचं स्वप्न केव्हा अन् कसं पूर्ण होणार…हा संपूर्ण प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत दळवी कुटुंबातील मोठ्या मुलाची म्हणजेच ‘संतोष श्रीनिवास दळवी’ ही भूमिका अभिनेता निखिल राजेशिर्केने साकारली आहे. मालिकेत त्याने साकारलेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा होतच आहे मात्र, हा अभिनेता सध्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.
निखिलच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे. ‘मदर्स डे’च्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत निखिलने नवीन गाडी घेतल्याची आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे. यामध्ये त्याची पत्नी व कुटुंबीय गाडीची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. निखिलने घेतलेली आलिशान गाडी पाहून कुटुंबीयांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला होता.
अभिनेत्याने ‘मारुती सुझुकी नेक्सा’ ही गाडी खरेदी केली आहे. फायनान्सशियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या गाडीची किंमत ५.२५ ते १४.८७ लाखांपर्यंत आहे. ( विविध शहरं आणि गाड्यांच्या व्हेरिएंटप्रमाणे किंमतीत बदल होऊ शकतो )
नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने “मीट माय न्यू हमसफर” असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये #Nexa #Travel असे हॅशटॅग्ज निखिलने दिले आहेत. सध्या संपूर्ण कलाविश्वातून निखिलवर नव्या गाडीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते. या मालिकेत निखलसह हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, दिव्या पुगावकर, मेघन जाधव, कुणाल शुक्ला, मीनाक्षी राठोड अशा बऱ्याच कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.