Lakshmi Niwas : ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ या महामालिकेत दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. या मालिकेत लक्ष्मीची भूमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर साकारत असून, त्यांच्या मुलीच्या भूमिकेत छोट्या पडद्यावरची स्टार अभिनेत्री अक्षया देवधर झळकत आहे.

अक्षयाने १४ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी संपूर्ण मराठी कलाविश्वातून अक्षयावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तिचा पती अभिनेता हार्दिक जोशीने सुद्धा अक्षयासाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहित बायकोचं कौतुक केलं होतं. याशिवाय ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या सेटवर ऑनस्क्रीन आईकडून म्हणजेच हर्षदा खानविलकरांकडून अक्षयाला गोड सरप्राइज मिळालं.

अक्षयाच्या वाढदिवशी हर्षदा यांची सुट्टी होती. त्यांचं शूटिंग शेड्युल नव्हतं. पण, तरीही अक्षयाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हर्षदा खानविलकर केक घेऊन ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या सेटवर पोहोचल्या होत्या. अक्षयाने हर्षदा खानविलकरांचे आभार मानत खास पोस्ट शेअर केली आहे.

अक्षया देवधर लिहिते, “माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हर्षदा ताईचं शूटिंगचं शेड्युल नव्हतं. तिला सुट्टी देण्यात आली होती… व्यग्र शेड्युलमुळे तिला विश्रांती घेण्याची चांगली संधी मिळाली होती. पण, तरीही ती सेटवर आली होती. कर्तव्यापोटी नव्हे तर माझ्यावरच्या प्रेमापोटी…चेहऱ्यावर सुंदर स्मितहास्य आणि तिच्या हातात केक होता. तिच्यामुळे माझा दिवस अविस्मरणीय ठरला. सुट्टी असूनही तिचं असं माझ्यासाठी सेटवर येणं, हे माझ्यासाठी खूप खास ठरलं…तो क्षण मी कधीच विसरणार नाही. हे बंधन शब्दांच्या पलीकडचं आहे. एखादी व्यक्ती आपल्यासाठी किती महत्त्वाची असते याची जाणीव झाली. हर्षदा ताईने मला जाणीव करून दिली की, काही माणसं तुमच्या आयुष्यात फक्त दिखाव्यासाठी नसतात ती कायम तुमच्याबरोबर राहतात, ती माणसं तुमच्याबरोबर प्रत्येक क्षण साजरा करतात. आय लव्ह यू ताई…मी तुझी खूप आभारी आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस हे माझं भाग्य आहे…तुझं मन खूप मोठं आणि सुंदर आहे. ताई तू दिलेल्या गिफ्ट्ससाठी थँक्यू.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
lakshmi niwas akshaya deodhar
अक्षया देवधव – हर्षदा खानविलकर ( फोटो सौजन्य : अक्षया इन्स्टाग्राम स्टोरी )

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लक्ष्मी आणि भावनाचं जसं ऑनस्क्रीन नातं आहे अगदी त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यात सुद्धा अक्षया हर्षदा खानविलकर यांचा खूप आदर करते. त्या सुद्धा सेटवर सगळ्यांची आपुलकीने काळजी घेतात. ही लोकप्रिय मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज रात्री ८ ते ९ या एक तासांच्या वेळेत प्रसारित केली जाते.