Lakshmi Niwas fame Janhvi’s Look: सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. या उत्सवाच्या निमित्ताने झी मराठी वाहिनीवरच्या विविध मालिकांमधील नायिका दर दिवशी विविध लूक करताना दिसत आहे.
आता ‘लक्ष्मी निवास’मध्ये जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकरने केलेला लूक सध्या लक्ष वेधून घेत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
जान्हवीच्या नवरात्रीच्या सातव्या दिवशीच्या लूकने वेधले लक्ष
या व्हिडीओमध्ये पाहाला मिळते की, जान्हवी नवरात्रीच्या सातव्या दिवसासाठी तयार होत आहे. सुरुवातीला तिचा सुंदर मेकअप करण्यात येतो. त्यानंतर तिने केसरी रंगाची साडी नेसल्याचे दिसत आहे. तसेच हातात बांगड्या, गळ्यात दागिने, मंगळसूत्र, नाकात नथ घातल्याचे दिसत आहे. कपाळावर चंद्रकोर, कानात झुमके घातल्याचे दिसत आहे. तिचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने लिहिले आहे, “नवरात्रीच्या सातव्या दिवशीचा जान्हवीचा साजशृंगार…”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
आता व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी जान्हवीचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “तू खूप सुंदर दिसत आहेस”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “जानू सुंदर दिसत आहेस”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “गोड”, तर अनेक नेटकऱ्यांनी, “खूप सुंदर”, “सुंदरी”, “क्यूट”, अशा कमेंट्स केल्या आहेत.




‘लक्ष्मी निवास’ या मालिकेबद्दल बोलायचे, तर या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच जयंतचे वागणे पटत नसल्याचे जान्हवीच्या आजीने जयंतसमोर बोलून दाखवले होते. तसेच, ती घरच्यांनादेखील याबद्दल सांगणार आहे, असेही तिने सांगितले होते. त्यानंतर जान्हवी त्याच्यापासून कायमची दुरावली जाऊ शकते म्हणून त्याने आजीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जान्हवीची आजी सध्या दवाखान्यात आहे.
या घटनेचा जान्हवीला मोठा धक्का बसला आहे. तसेच सिद्धू व भावनाच्या आयुष्यातही सतत संकटे येताना दिसत आहेत. या सगळ्यात लक्ष्मी व श्रीनिवास त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसतात. आता आगामी काळात या मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.