Zee Marathi Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नुकताच वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. एकीकडे ‘बायको हीच हवी’ म्हणत सिद्धूने भावनासाठी वडाच्या झाडाभोवती सात फेरे घेतले. तर, दुसरीकडे जान्हवीने लग्नानंतर तिची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. पण, ऐन सणाच्या दिवशी जयंतने आपल्या बायकोची मोठी परीक्षा घेतली.
जान्हवीचं आपल्यावर किती प्रेम आहे हे पाहण्यासाठी जयंतने मरणाचं नाटक केलं होतं. जयंतची अवस्था पाहून जान्हवी पूर्णपणे बिथरून गेली होती. सुरुवातीला जान्हवीने नवऱ्याचा पल्स रेट चेक केला, त्याला शेवटी CPR दिला पण, या सगळ्याचा काहीच उपयोग होत नाही. जवळपास तासाभराने जयंतने केलेलं नाटक जान्हवीसमोर उघड होतं. यानंतर मात्र जानू खूप संतापते.
जयंतला वैतागलेली जान्हवी स्वत:ला खोलीत कोंडून घेते. शेवटी जयंत तिची समजूत काढतो आणि दोघांमधला अबोला दूर होतो. पण, एवढं सगळं झाल्यावरही जयंत काही केल्या सुधारणार नाहीये. आताही जयंतच्या मनात जान्हवी अन् मॅडच्या ( विश्वा ) नात्याबद्दल संशय असतो. पण, ‘मॅड’ नेमका कोण आहे? हे जयंतला माहिती नसतं. यासाठीच तो एक नवीन प्लॅन करतो.
मॅडचं खरं नाव विश्वा असतं आणि याच्याबरोबरच जयंतने बिझनेस डील फायनल केलेलं असतं मात्र, त्याची खरी ओळख जयंतला माहिती नसते.
आता जान्हवीच्या अपरोक्ष जयंत तिच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींची भेट घेणार आहे. यावेळी तो मॅडबद्दल चौकशी करतो. पण, पुरेशी माहिती न मिळाल्याने जयंत शेवटी जानूच्या सगळ्या मित्रांना घरी येण्यासाठी आमंत्रण देतो. आता जान्हवीचे सगळे मित्र-मैत्रिणी घरी आल्यावर नक्कीच मॅडचा विषय निघणार याची खात्री जयंतला असते. त्यामुळे तो हॉलमधील टेबलाखाली रेकॉर्डर लावतो. जेणेकरून, जानूचे मित्रमंडळी जे काही बोलतील ते रेकॉर्ड होईल.
जयंत टेबलाखाली रेकॉर्डर सेट करत असतानाच जान्हवी तिथे पोहोचते आणि “जयंत तू काय करतो आहेस?” असं त्याला विचारते. जान्हवीला अचानक आलेलं पाहून जयंत थोडा सावध होतो… आता नवऱ्याचा डाव जानूच्या लक्षात येणार की मॅडचं सत्य जयंतला समजणार हे ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. हा विशेष भाग १८ आणि १९ जून रोजी प्रसारित केला जाणार आहे.