Zee Marathi Lakshmi Niwas : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. या शंभर भागांचा आनंद द्विगुणित तेव्हा झाला जेव्हा मुंबईचे रिक्षाचालक या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या टीमने नुकतंच एका खास सेलिब्रेशनसाठी रिक्षाचालकांना आपल्या सेटवर आमंत्रित केलं होतं. सध्या या मालिकेत श्रीनिवास, एका रिक्षाचालकाची भूमिका साकारत आहे. नोकरी गेल्यामुळे त्यांची दुसरी इनिंग सुरु झाली आहे. नोकरी जाऊनही हे सर्व कष्ट सुरु आहेत एका हक्काच्या घरासाठी. या सेलिब्रेशनमध्ये मालिकेतील सर्व कलाकार सामील झाले होते. रिक्षाचालकांनी, लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांचे अनुभव ऐकून लक्ष्मीची भूमिका साकारणाऱ्या हर्षदा खानविलकरांचे डोळे देखील पाणावले होते.

लक्ष्मी म्हणजेच हर्षदा खानविलकर यांनी सांगितले की, “मी अनेकदा मुंबईच्या रिक्षामध्ये प्रवास केला आहे, भलेही रात्रीचे २ किंवा ३ वाजले असतील पण, मला नेहमीच या रिक्षाचालकांनी सुरक्षितपणे घरी पोहोचवलं आहे आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो.” मालिकेतील सगळ्या कलाकारांनी मिळून या रिक्षाचालकांबरोबर केक कापला.

मालिकेत श्रीनिवासची भूमिका साकारत असलेली तुषार दळवी म्हणाले, “आपल्या या रिक्षाचालक बंधूंची प्रेरणादायी कथा ऐकून, त्यांच्या कुटुंबांप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणामुळे मी खूप भारावून गेलो. आम्ही ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत याच लोकांच्या खऱ्या आयुष्यातले अनुभव टीव्ही स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. आज यानिमित्ताने परत आम्हाला आठवण झाली की, आपण या कथा का सांगतो, सामान्य माणसाची ताकद आणि लवचिकता प्रतिबिंबित करण्यासाठी”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
lakshmi niwas
‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या सेटवर रिक्षाचालकांनी दिली भेट

रिक्षाचालक बंधू वेळात वेळ काढून ‘लक्ष्मी निवास’ सेटवर आले, त्यांनी श्रीनिवास व लक्ष्मीबरोबर गप्पा मारल्या आणि हे सगळे रिक्षाचालक १०० भागांच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले म्हणून ‘झी मराठी’ आणि ‘लक्ष्मी निवास’ कुटुंबाकडून त्यांना आंब्यांची पेटी भेट म्हणून देण्यात आली दिली.