Zee Marathi Lakshmi Niwas Serial Promo : भावनाच्या आजीने मध्यस्थी केल्यामुळे अखेर लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी सिद्धूला आपला जावई म्हणून स्वीकारलं आहे. आता लवकरच भावना आणि सिद्धूचं लग्न लावून द्यायचं असं लक्ष्मी-श्रीनिवासने ठरवलेलं असतं. या लग्नाचा प्रस्ताव घेऊन श्रीनिवास व त्यांची आई शांता हे दोघंही गाडेपाटल्यांच्या घरी जातात.

गाडेपाटलांकडे गेल्यावर आपला अपमान होणार याचा अंदाज आधीच श्रीनिवास आणि शांताला असतो. यावेळी सिद्धू दळवी कुटुंबीयांची ठामपणे बाजू घेतो. पण, “काहीही झालं तरी भावना या घरची सून होणार नाही” या मतावर सिद्धूची आजी ठाम असते. यावेळी सिद्धूच्या आजीला भावनाची आजी शांता सडेतोड उत्तरं देते. इतकंच नव्हे तर हरीशला सोडून माहेरी आलेल्या सिंचनाला सुद्धा आजी खडेबोल सुनावते.

सिद्धू भावनाशी लग्न होणार असल्याने प्रचंड आनंदी असतो. कोणीही कितीही अडवणूक करण्याचा प्रयत्न केला तरी मी भावना मॅडमशीच लग्न करणार या मतावर सिद्धू ठाम असतो. त्याची मनधरणी करण्याचा त्याची आई खूप प्रयत्न करते. पण, याने काहीच फरत पडत नाही.

शेवटी आता सिद्धूची आजी गाडेपाटलांच्या घरात मोठं नाटक करणार आहे. आजी सर्वांसमोर तिला अटॅक आल्याचं भासवते आणि आजारपणाचं नाटक करते. आजी अचानक आजारी पडल्याचा दोष सगळेजण भावनाला देऊ लागतात. आजीचा हा खोटेपणा सिद्धूला पटकन लक्षात येतो. तो मित्रांना खोटी पाल ( खेळण्यातील पाल ) आणायला सांगतो आणि आजीच्या हाताजवळ ही पाल ठेवून जोरजोरात “पाल आली, पाल आली” म्हणून ओरडतो.

इतक्यात आजी पटकन उठते आणि बेडवर उभी राहते. गोंधळ झाल्यामुळे सगळे गाडेपाटील कुटुंबीय आजीच्या खोलीत येतात, यावेळी सर्वांसमोर आजीचा खोटेपणा उघड होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २० आणि २१ जूनला ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रेक्षकांना हा मजेशीर प्रसंग पाहायला मिळणार आहे. आता आजीची खोड मोडल्यावर घरातील अन्य सदस्य सिद्धूला काय बोलणार? सिद्धू-भावनाच्या लग्नाला गाडेपाटलांच्या घरून कोणाचा पाठिंबा मिळणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.