‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच चर्चेचा विषय असते. २०१९च्या अखेरीस सुरू झालेली ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेच्या मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या अरुंधती या पात्राला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळत आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने हे पात्र उत्तमरित्या साकारलं आहे. तसेच इतर कलाकारांनीही आपापली पात्र सहजसुंदर अभिनयाने छान निभावली आहेत. त्यामुळे आजवर ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेला ४ वर्ष पूर्ण झाले असून आज मालिकेचा १२००वा भाग प्रसारित होणार आहे. त्यानिमित्ताने अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. मधुराणीची ही पोस्ट चांगली चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Video: कोर्टात हर्षवर्धनचा डाव येणार समोर, अखेर सई होणार मुक्ता-सागरची, नेमकं काय घडणार? वाचा…

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या व्हिडीओमध्ये ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील खास क्षण पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिल आहे, “नवीन वर्षाची सुरुवात कृतज्ञतेने करत आहे. आज आम्ही १२०० भाग आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे ४ वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत….हा किती सुंदर प्रवास… मनापासून कृतज्ञ वाटत आहे.”

हेही वाचा – Video: ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर रुपाली भोसलेचा वाढदिवस ‘असा’ केला साजरा, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुराणीच्या या पोस्टवर अनेक कलकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सलील कुलकर्णी, निरंजन कुलकर्णी, भक्ती रत्नपारखी अशा अनेक कलाकारांनी अभिनेत्रीचं अभिनंदन केलं आहे.