‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित सध्या लोकप्रिय टीव्ही शो ‘डान्स दिवाने ४’ मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. माधुरीचा १५ मे रोजी वाढदिवस आहे. या शोमध्ये तिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरीचा वाढदिवस खास असणार आहे. या शोमध्ये तिचे पती डॉ. श्रीराम नेने हजेरी लावणार आहेत. नवीन प्रोमोनुसार, शोमध्ये माधुरीला एक खास सरप्राइज मिळणार आहे.

डॉ. श्रीराम नेनेंची शोमध्ये हजेरी

कलर्स टीव्हीकडून या एपिसोडचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत. माधुरीचे पती श्रीराम नेने या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. ते दोघेही माधुरीच्या चित्रपटातील ‘तुमसे मिलके’ या रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसतील. माधुरीचा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी डॉ. नेने त्यांचा पाळीव श्वान कार्मेलोला देखील आणणार आहेत. तसेच ते आपल्या हातांनी लिहिलेलं एक खास पत्र माधुरीला भेट देतील. माधुरीच्या वाढदिवसाचं सरप्राइज इथेच संपणार नाही, यानंतर टीमने तिच्यासाठी बनवलेला एक खास व्हिडीओ स्क्रीनवर पाहायला मिळतो.

Video : ‘मैं कोल्हापूर से आयी हूँ’, माधुरी दीक्षितसह अंकिता लोखंडेचा जबरदस्त डान्स; म्हणाली, “मॅम मी तुमची…”

खास सरप्राइज नेमकं काय?

या व्हिडीओत माधुरी दीक्षितची मोठी बहीण रुपा दीक्षित दांडेकर व अभिनेत्रीची दोन्ही मुलं तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. व्हिडीओमध्ये माधुरीची बहीण बालपणीच्या आठवणी सांगते आणि माधुरीचं कौतुक करते. “माधुरी… मी एका लहानशा मुलीला आदरणीय व्यक्ती होताना पाहिलं आहे, जिचं कौतुक संपूर्ण जग करतंय. मी जेव्हा तुझ्याबरोबर वेळ घालवते, गप्पा मारते तेव्हा मला वाटतं की मी किती नशीबवान आहे की तू माझी लहान बहीण आहेस. मला आपलं बालपण आठवतंय.. गप्पा मारणं, शाळेतून येताना पावसात भिजणं, खेळणं, नाटक करणं, अनेक डान्स प्रॅक्टिस आणि परफॉर्मन्सेस, सगळं जादुई होतं. तुझ्या वाढदिवसानिमित्त मी प्रार्थना करते की तू सदैव हसत राहो, मस्ती करत राहो, डान्स प्रॅक्टिस करत राहो आणि परफॉर्म करत राहो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माधुरी,” असं रुपा म्हणाली.

मुलांचा व्हिडीओ पाहून माधुरीला अश्रू अनावर

हा व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित भावुक होते. त्यानंतर तिची दोन्ही मुलं अरीन व रायन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. “आई तू आमची आदर्श आहेस, तू आम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत केलीस, तू आम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यास प्रोत्साहित केलंस, तू शिकवलेल्या गोष्टींचं पालन आम्ही अमेरिकेत करतोय, आम्हाला तुझी खूप आठवण येते, लवकरच भेटू,” असं हे दोघेही म्हणतात.

“कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय,” प्रवीण तरडेंचं प्रचारसभेत विधान; म्हणाले, “इथं उपस्थित प्रत्येकाच्या बापजाद्याने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहिल्यावर माधुरी दीक्षितला अश्रू अनावर होतात. त्यानंतर होस्ट भारती सिंग माधुरीजवळ जाऊन तिला मिठी मारते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. प्रेक्षकांना ‘डान्स दिवाने ४’ चे हे एपिसोड शनिवार व रविवारी रात्री साडेनऊ वाजता पाहता येतील.