‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या गौरव मोरेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याची स्टाइल, त्याचं बोलणं हे प्रेक्षकांना खूप आवडतं. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा त्याचा लोकप्रिय डायलॉग. यामुळे त्याला फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ओळख मिळाली आहे. सध्या त्याने काही आठवड्यांसाठी हास्यजत्रेमधून ब्रेक घेतला आहे. चित्रपटांचं चित्रीकरण आणि आरोग्य या कारणास्तव गौरव काही दिवसांपासून हास्यजत्रेत पाहायला मिळत नाहीये. पण लवकरच तो जोरदार कमबॅक करणार आहे.

नुकताच गौरव मोरे अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने आतापर्यंतचा प्रवास आणि बरेच खुलासे केले. तसेच गौरव बरोबर रॅपिड फायर हा खेळ खेळण्यात आला. यादरम्यान गौरवला त्याच्या क्रशपासून ते आवडती गाडीपर्यंत असे अनेक प्रश्न विचारले गेले.

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, म्हणाला, “गेल्या आठ वर्षांपासून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रॅपिड फायरच्या खेळात भार्गवीने विचारलेल्या एका प्रश्नाचं गौरवने कौतुकास्पद उत्तर दिलं. गौरवला विचारलं, “जर तुला सुपर पॉवर दिली. तर एखादी कोणती गोष्ट करायला आवडेल?’ गौरव उत्तर देत म्हणाला, “अगदी प्रामाणिकपणे सांगू. सगळ्यांना वाटले मी स्क्रीनसमोर बसलोय म्हणून मुद्दाम बोलतोय. मी रस्त्यावर एकाही लहान मुलाला भीक मागताना दिसू देणार नाही. तसेच मी एकाही गरीब माणूस दिसू देणार नाही. मी सगळ्यांना गायब करेन. गायब म्हणजे चांगलं आयुष्य त्यांना देईन. मागे पण एका मुलाखतीमध्ये मी बोललो होता. मला ही गोष्ट मनाला खूप लागते. लहान मुलांना बघतो किंवा इतर माणसांना बघतो, जे रस्त्यावरती दिवस काढतात. जर मला जादू मिळाली, तर मी त्या सगळ्यांना श्रीमंत करेन.”