‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय हास्य कार्यक्रम आहे. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. हा शो व यातील कलाकार खूप लोकप्रिय आहेत. सध्या या शोने टीव्हीवरून ब्रेक घेतला असून ते परदेशात कार्यक्रमांसाठी जात आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकार सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्याचा लोणावळ्याला जाताना अपघात, ट्रकने कारला दिली धडक; म्हणाला, “मी रात्रभर…”

वनिता खरात, गौरव मोरे, पृथ्विक प्रताप, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, समीर चौघुले हे सर्व कलाकार अमेरिका दौऱ्यावर आहे. आता पृथ्विक प्रतापने थेट अमेरिकेतून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंमध्ये पृथ्विक आलिशान लिमोझिन कारमध्ये बसलाय आणि त्याच्या हातात ग्लास आहे. पण त्या ग्लासात शँपेन नाही अॅपी फिझ असल्याचं त्याने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. पृथ्विकचे हे फोटो शिवाली परबने काढले आहेत.

रवींद्र महाजनींचे पार्थिव पाहताच पत्नीला कोसळलं रडू; आईला सावरताना दिसला गश्मीर महाजनी

“एक ही तो ज़िंदगी है, ऐसे ही थोड़ी न मरूँगा…
बेपरवाही, अय्याशी, नवाबी…
पता नहीं क्या क्या करूँगा।” असं कॅप्शन पृथ्विकने या फोटोंना दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमेरिकेत गेल्यावर पृथ्विकने आईबद्दलची एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने आईच्या साडीपासून बनवलेला कुर्ता घालून अमेरिकेत फिरत असल्याची माहिती दिली होती. तसेच लवकरच आईला अमेरिकेला फिरायला घेऊन जाणार, असंही तो म्हणाला होता.