अभिनेता गौरव मोरे सध्या त्याच्या ‘लंडन मिसळ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतीच त्याने राजश्री मराठीच्या ‘त्याची गोष्ट’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी गौरवने तो अभिनय क्षेत्राकडे कसा वळला याबद्दल खुलासा केला.

गौरव मोरे म्हणाला, “मला खूप लोक म्हणाले होते तुझं आयुष्यात काहीच नाही होणार पण, अशा लोकांना मी आताही काहीच उत्तरं देत नाही. लहानपणापासून मराठी असो किंवा हिंदी जे सिनेमे लागायचे ते सगळे मी पाहायचो. पडद्यावर अभिनय करणाऱ्या कलाकारांचं मला प्रचंड कौतुक वाटायचं. त्यांची मी मिमिक्री करायचो. पण, अभिनयाची गोडी मला खऱ्या अर्थाने कॉलेजमध्ये असताना लागली.”

हेही वाचा : “Happy Birthday नवरा”, रितेश देशमुखसाठी जिनिलीयाची रोमँटिक पोस्ट, म्हणाली, “मला कोणी विचारलं…”

गौरव पुढे म्हणाला, “आमच्या कॉलेजमध्ये फेस्टिव्हल सुरू असताना माझे मित्र मला म्हणाले एकपात्री स्पर्धा आहे आपण बघायला जाऊया. तेव्हा मला एकपात्री स्पर्धा वगैरे काहीच माहिती नव्हतं. पण, जेव्हा प्रत्यक्षात एक माणूस एवढ्या भूमिका साकारतोय हे पाहिलं तेव्हा मला भारी वाटलं.”

हेही वाचा : Video : “लग्नाची २५ वर्षे साधी गोष्ट नाही”, रवी जाधव यांनी बायकोला दिलं खास सरप्राईज, ‘अशी’ आहे दोघांची प्रेमकहाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कॉलेजमध्ये असताना मला काहीच कळायचं नाही सगळ्या गोष्टी मित्र सांगायचे. परीक्षेचे विषय सुद्धा मी मित्राचे ऐकून निवडले होते. एवढंच नव्हे तर माझ्या मित्राचं ऐकून मी बीएमएम (BMM) घेतलं वर्षभर काहीच अभ्यास जमला नाही आणि मग मी नापास झालो. पुढे, एक दिवस त्याच मित्रांबरोबर मी एकांकिका स्पर्धा पाहायला गेलो होतो. तेव्हा पाहिलं की, या कलाकारांसाठी सगळे प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. न्यूजवाले त्यांच्या मुलाखती घेत आहेत. त्या क्षणाला मला जाणवलं की आपण सुद्धा अभिनय क्षेत्राकडे वळलं पाहिजे. तेव्हा माझ्या जवळच्या मित्राला फोन करून मी माझा अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय कळवला होता.” असं गौरव मोरेने सांगितलं.