‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे आज अभिनेता गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय आहे. परंतु, आयुष्यात हा यशाचा टप्पा गाठण्यासाठी त्याने बालपणापासून प्रचंड मेहनत घेतली. गौरवने ‘लंडन मिसळ’ चित्रपटाच्या निमित्ताने नुकतीच राजश्री मराठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने त्याच बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, पहिली ऑडिशन ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा आजवरच्या प्रवासाबद्दल सांगितलं.

अभिनय क्षेत्रात काम करायला मिळावं यासाठी घरच्यांची समजूत कशी काढलीस? याविषयी सांगताना गौरव मोरे म्हणाला, “प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाने व्यवस्थित नोकरी करून जीवन जगावं असं मनापासून वाटतं. कारण, दिवसेंदिवस त्यांचं वय वाढत असतं, ताकद कमी होते. त्यामुळे मुलांच्या करिअरची आई-बाबांना प्रचंड भीती असते. कोणाचेही पालक कधीच आपल्या मुलांचा वाईट विचार करणार नाहीत. या गोष्टी आता मला कळत आहेत. तुम्हाला तुमचे घरचे ओरडत असतील, तर त्यामागे खरंच आपलं चांगलं व्हावं अशी इच्छा असते.”

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’मध्ये मराठी संवाद का होते? उपेंद्र लिमयेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “संदीपला मी…”

गौरव पुढे म्हणाला, “काही वर्षांपूर्वी ऑडिशनला जायचेही पैसे नसायचे. त्यामुळे सगळ्या ऑडिशनला मी चालत जायचो. पवई ते अंधेरी मी अनेकदा चालत गेलो आहे. एके दिवशी वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजला असताना माझ्याकडचे सगळे पैसे संपले. त्यामुळे वडाळा ते फिल्टरपाडा पवई एवढं अंतर मी चालत आलो आहे. अंधेरीला असणाऱ्या बहुतांश ऑडिशन्सला मी चालत जायचो. ऑडिशन व्यतिरिक्त मी हळुहळू नाटकात काम करण्यास सुरूवात केली. नाटकामुळे माझ्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला.”

हेही वाचा : अनुष्का शर्माच्या भावानंतर ‘अ‍ॅनिमल’फेम तृप्ती डिमरी श्रीमंत उद्योगपतीला करतेय डेट? ‘या’ फोटोमुळे अफेअरच्या चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एका नाटकाच्या संस्थेत मी बॅकस्टेजला काम करायचो तेव्हा मला १५० रुपये मिळायचे. ते माझ्या हक्काच्या कमाईचे पैसे असल्याने मला प्रचंड आनंद व्हायचा. ‘ये दिन भी निकल जायेगा’ हे माझं ठरलेलं वाक्य आहे. कालांतराने ‘हास्यसम्राट २’ या कार्यक्रमात मला पहिल्यांदा काम मिळालं. मला पहिल्यांदा टीव्हीवर पाहून घरातले सगळेजण प्रचंड आनंदी झाले होते.” असं गौरव मोरेने सांगितलं.