‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रेक्षकवर्ग आहे. या कार्यक्रमाचा नुकताच अमेरिका दौरा झाला. त्यानंतर पुन्हा हे विनोदवीर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, मध्यंतरी या कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकार शिवाली परब आणि निमिष कुलकर्णी हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आता निमिषने मौन सोडलं आहे.

शिवालीने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये शिवालीने निमिषचा हात हातात पकडला होता आणि निमिष गोड हसताना दिसत होता. हा फोटो शेअर करत तिनं लिहिलं होतं की, “माझ्या निब्बाबरोबर डेट.” क्युट बेबी असं हॅशटॅग दिलं होतं. या फोटोमुळे शिवाली आणि निमिष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या.

हेही वाचा – ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत ‘या’ भूमिकेत दिसणार किरण माने; म्हणाले, “खूप वर्षांनी…”

हेही वाचा – लग्न न करताना अभिनेत्री झाली आई; ट्रोल झाल्यावर सोडलं मौन, म्हणाली, “मी आधीच…”

या चर्चांवर आता निमिष ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेन्मेंट यूट्यूब चॅनेलवर बोलत असताना म्हणाला की, “जेव्हा शिवालीबरोबरच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या, तेव्हा या सेटवरच्या १५ जणांनी तरी त्या मला पाठवल्या होत्या. त्या पण वेगवेगळ्या वृत्तसंस्थेच्या बातम्या पाठवल्या. हे काय आहे? निमिष हे खरं आहे का?, असं प्रत्येकांनी त्या बातम्यांच्या खाली हे एक वाक्य लिहिलं होतं. पण, ही अफवा आहे. अजिबात असं काही नाहीये. आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिणी आहोत. उद्या साक्षीने जरी माझ्याबरोबर स्टोरी टाकली, तरी तुम्ही असं काही समजू नका. आम्हाला एकत्र खूप चांगलं काम करायचं आहे, पण ती अफवा मी खूप एन्जॉय केली होती.”

हेही वाचा – “माझा दादा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होता अन्…” हेमांगी कवीने नितीन देसाईंच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाली, “असा निर्णय घेताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निमिषच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तो ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’नंतर ‘स्टार प्रवाह’च्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकामध्ये झळकला. पण, आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकासुद्धा बंद झाली असून निमिष पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.