‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना एक नवीन ओळख मिळाली आहे. प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, निखिल बने, रोहित बने, वनिता खरात, गौरव मोरे हे सगळे कलाकार हास्यजत्रेमुळे प्रसिद्धीझोतात आले. यापैकी लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरातने मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा काम केलेलं आहे.

वनिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या अभिनेत्रीच्या डान्स व्हिडीओची सर्वत्र चर्चा चालू आहे. या व्हिडीओत वनिताने प्रथमेश परब या प्रसिद्ध कोरिओग्राफरसह भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नितेश चव्हाणच्या बहिणी म्हणून झळकणार ‘या’ चार अभिनेत्री, नवा दमदार प्रोमो पाहा

२००८ मध्ये ‘ऑक्सिन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, चिन्मय मांडलेकर, मोहन जोशी, कमलेश सावंत, संदीप पाठक यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. यामधील “तुरु-तुरु चालू नको…” हे गाणं घराघरांत लोकप्रिय आहे. आजच्या घडीला अनेक लग्नसमारंभात हे गाणं वाजवलं जातं. हे गाणं आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलं आहे. याच प्रसिद्ध गाण्यावर वनिता खरातने भन्नाट डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीची जबरदस्त एनर्जी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा : सेटवर विवेक ओबेरॉयचा भीषण अपघात पाहून दिग्दर्शकाला आलेला हृदयविकाराचा झटका; अभिनेता म्हणाला, “अभिषेक बच्चन व अजय…”

वनिता खरातच्या या व्हिडीओवर सगळ्याच कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवाली परब, चेतन गुरव, चेतना भट, नम्रता संभेराव, अक्षया नाईक, वैशाली सामंत, इशा डे या सगळ्या कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांना लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : ‘ती’च्याशी अफेअरची चर्चा अन् ६१ वर्षांचे संजय लीला भन्साळी अद्याप अविवाहित; एकदा म्हणालेले, “ज्यांचं लग्नाचं वय उलटून…”

हेही वाचा : “महिला कलाकारांचे चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा”, मराठी अभिनेत्याची सूचक पोस्ट, पापाराझींबद्दल म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वनिता खरातच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘कबीर सिंग’ चित्रपटात शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. याशिवाय गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात ती झळकली होती.