Maharashtrachi Hasyajatra Writer: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी मालिकेचा लेखक व सहायक दिग्दर्शक विनायक पुरुषोत्तमबरोबर एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. त्याने स्वतः फेसबूकवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वरून बोरिवलीच्या दिशेने येत असताना ही घटना घडली आणि याबाबत पोलिसांना कळवलं आहे, असंही विनायकने सांगितलं.

विनायक पुरुषोत्तमने त्याच्या फेसबूक पोस्टमध्ये आकुर्ली आणि पोईसर मेट्रो स्थानकरादरम्यान घडलेला प्रकार सांगितला. “मी आत्ता रात्री ४ वाजता वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून बोरिवलीच्या दिशेने येत असताना आकुर्ली आणि पोईसर मेट्रो स्थानकाच्या दरम्यान दोन माणसांनी गाडीवर बांबू मारून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.. माझ्या समोरच्या गाडीवर बांबू मारल्याने मी सावध झालो आणि वेग वाढवल्यामुळे थोडक्यात वाचलो.. दोन्ही माणसे अर्धनग्न अवस्थेत होती आणि हातात मोठे बांबू घेऊन रस्त्याच्या मधोमध उभी होती.. घडलेली घटना फोनद्वारे पोलीसांना ही कळवली आहे.
मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसारख्या नेहमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी ही घटना होते हे भीतीदायक आहे. तरीही सगळ्यांनी रात्री उशिरा हायवेवरून प्रवास करताना काळजी घ्या… सतर्क रहा…”, अशी पोस्ट विनायकने केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सीएमओ महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे.

Vinayak Purushottam post
विनायक पुरुषोत्तमची पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

Bigg Boss Marathi: अरबाज पटेल घराबाहेर पडल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेत; शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनायकने घडलेला हा धक्कादायक प्रसंग सांगितला, तसेच लोकांना प्रवास करताना सावध राहण्यास सांगितलं आहे. विनायकच्या या पोस्टवर कमेंट करून काही जणांनी काळजी घेण्यास सांगितलं आहे.