scorecardresearch

“कर्कटकने रंगवलेले बाक, पेन फायटिंग अन्…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील अभिनेता रमला शाळेच्या आठवणीत

यात त्याने शाळेच्या बाकाचा फोटो पोस्ट केला आहे.

“कर्कटकने रंगवलेले बाक, पेन फायटिंग अन्…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील अभिनेता रमला शाळेच्या आठवणीत
यात त्याने त्याच्या शाळेचे नाव सांगत एक गोड आठवणही सांगितली आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेतील आठवणी काही खास असतात. शाळेत केलेली धमाल, मस्ती, एकत्र खाल्लेला डब्बा, अभ्यास या सर्वच गोष्टींचा मनात कुठेतरी एक कप्पा असतो. शाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोरुन सर्व आठवणी निघून जातात. नुकतंच अभिनेता प्रसाद खांडेकर याने शाळेच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या शाळेचे नाव सांगत एक गोड आठवणही सांगितली आहे.

प्रसाद खांडेकर हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचला. विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने तो प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा प्रसाद रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रसाद खांडेकरचे ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटकही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा : “माझी बदनामी…” ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच किरण मानेंचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

नुकतंच प्रसादने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने शाळेच्या बाकाचा फोटो पोस्ट केला आहे. त्या बाकावर पेनाने लिहिल्याचे, त्यावर रेघोट्या मारल्याचे दिसत आहे. याबद्दल त्याने कॅप्शन लिहिली आहे.

प्रसाद खांडेकरची पोस्ट

“हा पृष्ठभाग बघून हे काय आहे सांगा

लहानपणी आपल्या पैकी बऱ्याच जणांनी असे पृष्ठभाग पेनाने ….करकटक ने रंगवले असतील ….
असे पृष्ठभाग रंगवणे
पेन फायटिंग खेळणे
डोळ्यांची स्पर्धा लावणे
पुस्तक उघडून त्यातल्या पेज नंबर नुसार मॅच खेळणे

हे खेळ आता पुन्हा खेळणं नाही होणार

Miss those golden days
माझी शाळा, चोगले हायस्कुल बोरिवली”, असे प्रसाद खांडेकरने म्हटले होते.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लग्नाची तारीख समोर, म्हणाली…

दरम्यान प्रसाद खांडेकर हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचला. विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने तो प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. काही दिवसांपूर्वी विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा प्रसाद रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या