‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपासून ओंकार भोजने हा ‘करुन गेलो गाव’ या नाटकात काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ओंकार भोजनेने त्याच्या क्रशबद्दल भाष्य केले होते. आता त्या दोघांनीही एकमेकांची भेट घेतली आहे.

ओंकार भोजनेने काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्याला त्याच्या सिनेसृष्टीतील क्रशबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने “माझी क्रश अशी कोणीही नाही. पण ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावालकर हिचा मी चाहता आहे”, असा खुलासा केला होता.
आणखी वाचा : “माझी कोणीही क्रश नाही, पण कोकण हार्टेड गर्लचा…”, ओंकार भोजनेचा खुलासा

आता नुकतंच ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावालकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात अंकिता आणि ओंकार भोजनेबरोबरच्या भेटीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अंकिता ही चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवत लाजत असल्याचे दिसत आहे. तर ओंकार हा मिश्किल हसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ओंकार आणि अंकिता हे दोघेही एकमेकांना भेटल्यानंतर काढलेल्या या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. ““त्या” नंतर “ते” दोघं भेटले”, असे कॅप्शन अंकिताने या फोटोला दिले आहे. अंकिताची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती? 

दरम्यान ओंकार भोजने हा अंकिताचा खूप मोठा चाहता आहे. “माझी क्रश अशी कोणीही नाही. पण कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकर या इन्स्टाग्राम स्टारचा मी खूप मोठा चाहता आहे. ती बिनधास्त, बेधडक अशी मराठी मुलगी आहे”, असे ओंकार भोजनेने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ती माझी क्रश नाही, पण मी तिला फॉलो करतो. तिचा स्वभाव मला आवडतो. ती ज्याप्रकारे रिल्स बनवते, तसेच बिनधास्त कोणत्याही एखाद्या सामाजिक विषयाला उचलून धरते, ते मला फार आवडते. मला तिचा खूप आदर वाटतो. तिचं कामही मला आवडतं. मी प्रेम वैगरे या भानगडीत पडत नाही”, असेही ओंकार भोजने म्हणाला होता.