परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते अशी मराठीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट १ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित झालं; जे सध्या युट्यूब म्युझिकवर ट्रेडिंग होतं आहे. या गाण्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींनी व्हिडीओ केला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. यावेळी या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेराव, प्राजक्ता माळी, वनिता खरात आणि चेतना भट या चौघींनी ‘नाच गं घुमा’ या गाण्यावर व्हिडीओ केला. नम्रताने तिच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

maharashtrachi hasya jatra fame rohit mane new home
Video : मुंबईत पहिलं घर, बायकोसह पूजा अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचा हक्काच्या घरात गृहप्रवेश!
Tejas Thacekray dance viral video
Anant – Radhika Wedding : अनंत अंबानींच्या संगीत सोहळ्यात तेजस ठाकरेंचा डान्स, भाजपाची व्हायरल Video वरून टोलेबाजी; आशिष शेलार म्हणाले, “महाराष्ट्राचा उमदा…”
What Supriya Sule Said About Bus?
सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “टीम इंडियासाठी गुजरातहून बस का आणली या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस…”
alpha girls alia bhatt and sharvari joins yrf spy universe
‘YRF स्पाय युनिव्हर्स’मध्ये आलिया भट्टची एन्ट्री! जोडीला असेल महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात, सध्या ‘मुंज्या’मुळे आहे चर्चेत
Maharashtrachi Hasyajatra fame Prasad Khandekar share unforgettable experience with the world champion Indian team
Video: “हार्दिकने माझ्याकडे बघून…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला विश्वविजेत्या भारतीय संघाचा आला अविस्मरणीय अनुभव, म्हणाला…
gaurav more and nikhil bane dances with boyz 4 team
“निशाणा तुला दिसला ना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे अन् निखिल बनेचा हटके डान्स, नेटकरी म्हणाले…
Gayatri Soham and Sanika Amit Maharashtrian connection
लोकप्रिय मराठी अभिनेत्रींची हिंदी मालिकेच्या सेटवर झाली मैत्री; म्हणाली, “जेव्हा दोन महाराष्ट्रीय लोक….”
maharashtrachi hasya jatra fame shivali parab and chetana bhat dances on bai ga song
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब अन् चेतना भटचा ‘बाई गं’वर जबरदस्त डान्स! स्वप्नील जोशीने केली खास कमेंट

हेही वाचा – Video: आलिया भट्ट-रणबीर कपूरने वांद्रे येथील नव्या आलिशान घराची केली पाहणी, किंमत वाचून व्हाल थक्क

“आम्ही बाई घुमा आम्ही बाई घुमा…ऑस्ट्रेलियात वेगवेगळे कपडे घालून घुमा (यमक जुळवण्याच्या धडपडीसाठी माफ करा),” असं कॅप्शन लिहित नम्रताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “क्या बात है.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “लेडीज गँग जिंदाबाद.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खूप छान.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अरे एकदम कडक.”

हेही वाचा – Video: फुलांचा वर्षाव, भन्नाट उखाणा अन्…, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम तितीक्षा तावडेचा सासरी ‘असा’ झाला गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ हे गाणं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंतने गायलं आहे. तसंच हे गाणं परेश मोकाक्षी यांनी लिहिलं आहे. याशिवाय या गाण्यातील नृत्यदिग्दर्शनाची भूमिका राहुल ठोंबरेने सांभाळली आहे.