आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मागील दहा दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे मंगलमय आणि उत्साहाच वातावरण निर्माण झालं होतं. आज “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात गणरायला निरोप दिला जात आहे. काल मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं.

हेही वाचा – Video: “मालिका बंद करा”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील कलाकार मंडळी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. सलमान खान, शाहरुख खान, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉक, पंकज त्रिपाठी, अनुपम खेर असे अनेक सेलिब्रिटींनी एकनाथ शिंदेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर काल मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी ‘वर्षा’ निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप देखील उपस्थितीत होता. त्यानं नुकतीच यासंबंधीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

हेही वाचा – Chandramukhi 2: कंगना रणौतला मोठा झटका; ‘चंद्रमुखी २’ प्रदर्शित होताच झाला लीक, कमाईवर होणार परिणाम?

काही फोटो शेअर करत पृथ्वीकनं लिहीलं आहे की, “दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र तसेच लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गणेश दर्शन आणि गणेश आरतीसाठी निमंत्रित केलं. यावेळेस मुख्यमंत्री यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट झाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या आमच्या कार्यक्रमाच त्यांनी अगदी तोंडभरून कौतुक देखील केलं.”

“गणेशोत्सवाच्या निमित्ताने सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांनी सुद्धा दर्शनासाठी हजेरी लावली. आम्हा सगळ्यांना आमंत्रित केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि कुटुंबियांचे खूप आभार,” असं पृथ्वीक लिहीलं आहे.

हेही वाचा – “आयुष्याची काही वर्ष…” लतादीदींसाठी अभिजीत केळकरनं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला…

हेही वाचा – झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद? ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हास्यजत्रेमधील पृथ्वीक व्यतिरिक्त बरेच कलाकार मंडळी ‘वर्षा’वर हजर झाले होते. समीर चौघुले, नम्रता संभेराव, गौरव मोरे, अरुण कदम, वनिता खरात असे बरेच जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले होते.