‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते म्हणजे समीर चौघुले. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. समीर चौघुलेंचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरही ते प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्टबद्दल अनेकदा ते पोस्ट शेअर करत माहिती देतात.

कल्पक विनोदबुद्धी व अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवणारे समीर चौघुले अभिनय क्षेत्रात येण्याआधी बँकेत नोकरी करत होते. चौघुलेंनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. “तुम्ही स्व: कमाईतून कोणती पहिली गोष्ट खरेदी केली होती?” असा प्रश्न समीर चौघुलेंना विचारण्यात आला.

हेही वाचा>> “अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत,” राज ठाकरेंची फटाकेबाजी, ‘खुपते तिथे गुप्ते’चा नवा प्रोमो पाहिलात का?

समीर चौघुले या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाले, “आईवडिलांसाठी मी आइसक्रिम घेतलं होतं. माझ्या आईला आइसक्रिम खूप आवडतं. तेव्हा मी बँकेत नोकरीला लागलो होतो. त्यावेळी मला महिन्याला ३३७ रुपये पगार होता. पहिल्या पगारातून मी आईसाठी आइसक्रीम घेतलं होतं.”

हेही वाचा>> “मला माझी जन्मतारीख माहीत नाही”, ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडचा खुलासा, म्हणाला, “ससून रुग्णालयात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर चौघुलेंनी अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. मराठी चित्रपटांतूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘जग्गू आणि ज्युलिएट’, ‘बांबू, ‘हवाहवाई’, ‘चंद्रमुखी अशा चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.