‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमातील हास्यवीर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक कलाकारांना याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली. गुणी अभिनेत्री वनिता खरातही हास्यजत्रेतून घराघरात पोहोचली.

‘कबीर सिंग’ चित्रपटातून अभिनयाची छाप पाडणारी वनिता आता नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वनिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली आहे. ‘सरला एक कोटी’ या चित्रपटातून वनिता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. “डाव लागलाय मोठा, काही लागणा मेळ…येडं झालंय गाव सारं, सुरू झालाय खेळ… भाबड्या लोकांची डांबरट गोष्ट…’सरला एक कोटी’”, असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>> Bigg Boss 16: अब्दू रोजिकची घरवापसी? ‘बिग बॉस हिंदी’मध्ये पुन्हा येणार मोठा ट्विस्ट

हेही वाचा>>“…म्हणून मी त्यांना चित्रपटात घेतो”, रोहित शेट्टीचं मराठी कलाकारांबाबत मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनिता खरातच्या या मराठी चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ओंकार भोजने व अभिनेत्री ईशा केसकर मुख्य भूमिकेत आहेत. तर छाया कदम, रमेश परदेशी, अभिजीत चव्हाण हे कलाकाराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून याचे दिग्दर्शन नितीन सुपेकर यांनी केलं आहे. ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट २० जानेवरी २०२३ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही पाहा>> “मला चित्रपटातून उत्पन्न मिळतं त्यापैकी ६० टक्के महाराष्ट्राचा…”, रोहित शेट्टीने केलेलं वक्तव्य चर्चेत

वनिताच्या या नवीन चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. वनिताच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.