‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. अभिनेत्री नम्रता संभेराव सुद्धा या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आली. आज अभिनेत्री तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारमंडळी वाढदिवसानिमित्त नम्रतावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या सगळ्यात वनिता खरातने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वनिता खरात आणि नम्रता संभेराव या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या दोन अभिनेत्रींची खऱ्या आयुष्यातही घट्ट मैत्री आहे. आज नम्रताच्या वाढदिवसानिमित्त वनिताने खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा टॅलेंट हाऊस, तुझ्या पिटाऱ्यातून नवनवीन पात्र येत राहूदे…लव्ह यू” असं म्हटलं आहे. वनिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघींनी एकमेकींना मिठी मारल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “जेवणाचा मेन्यू ठरवताना तब्बल १२ वेळा…”, प्रसिद्ध डिझायनरने सांगितला रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा किस्सा

वनितासह प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले यांनीही नम्रतासाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा नमा ताई! अशीच तुफान बॅटिंग करत रहा!” असे कॅप्शन देत प्रियदर्शनीने अभिनेत्रीचा बॅटिंग करतानाचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : काय सांगता! प्रभासला पडलं टक्कल? अभिनेत्याच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चाहत्यांना धक्का, जाणून घ्या सत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे नवीन पर्व प्रेक्षकांच्या आग्रहास्तव १४ ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्यात आले आहे. सध्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री नम्रता संभेराव प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकतीच तिने ‘वाळवी’ चित्रपटात सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली होती.