मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, अनुजा साठे, सौरभ गोखले, क्षिती जोग, अमेय वाघ, जितेंद्र जोशी, शशांक केतकर, वैदेही परशुरामी अशा बऱ्याच मराठी कलाकारांनी हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे आजकाल हिंदी चित्रपट, वेब सीरिजमध्ये मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत. अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्री ‘मेड इन इंडिया’ फेम मिलिंद सोमणबरोबर झळकणार आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतः पोस्ट केली आहे.

हेही वाचा – Video: सुबोध भावेने ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर, म्हणाला, “मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार…”

प्रसिद्ध मॉडेल, अभिनेता, निर्माता मिलिंद सोमणबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील अभिनेत्री वनिता खरात पाहायला मिळणार आहे. अलीकडेच वनिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर याविषयी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये वनिता साडीत दिसत असून तिच्या कानाला हेडफोन लावले पाहायला मिळत आहे. तर मिलिंद सोमण वर्कआउट करताना दिसत आहे.

वनिताची मिलिंद सोमणबरोबरची ही नवी जाहिरात आहे; जी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीय येणार आहे. ही जाहिरात कशासंदर्भात आहे? हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

हेही वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायरा वायकुळ लवकरच होणार मोठी ताई, स्वतःच दिली आनंदाची बातमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वनिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ व्यतिरिक्त नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेत ती पाहायला मिळत आहे. याशिवाय वनिताने आपल्या अभिनयाचा ठसा हिंदीतही उमटवला आहे. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील वनिताची भूमिका चांगलीच गाजली होती.