scorecardresearch

Premium

“मोदकाच्या पाकळ्या करताना…”, विशाखा सुभेदार यांनी दिली मोदक उत्तम होण्यासाठी खास टीप, म्हणाल्या, “त्याचं सारण…”

त्यांनी मोदक कसे चांगले होतात आणि त्यासाठी काय महत्त्वाचं असतं हे सांगितलं आहे.

Vishakha

पुढच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त सध्या सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. कुणी घरीच गणपतीची मूर्ती बनवत आहे, तर कोणी सजावटीच्या तयारीला लागलं आहे. पण गणपती म्हटलं की पटकन डोळ्यासमोर येतात ते मोदक. अनेक जण मोदक घरीच बनवण्याच्या प्रयत्नात असतात. काहींना ते जमतात, तर काहींचा आकार बिघडतो. तर आता मोदक बनवण्यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक खास टीप दिली आहे.

विशाखा सुभेदार आत्तापर्यंत अनेक कार्यक्रम आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्या घरीही गणपती असतो. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून त्या घरी नातेवाईक आणि मित्रमंडळींबरोबर गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी त्या नैवेद्य आणि मोदक घरीच बनवतात. तर आता त्यांनी मोदक कसे चांगले होतात आणि त्यासाठी काय महत्त्वाचं असतं हे सांगितलं आहे.

Farmers protest
शंभू सीमेवर धडकलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीच्या वेशीवर तणाव
Boyfriend and girlfriend became ATM thieves to get married
नागपूर : प्रियकर-प्रेयसी लग्न करण्यासाठी बनले एटीएम चोर
One was stabbed to death by his friend for not paying for drinking
दारुसाठी पैसै न दिल्याने मित्राचा खून, नव्या आयुक्तांसमोर आव्हान
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : बुद्धिमत्ता चाचणी तयारी

आणखी वाचा : “नवीन मालिका खूपच वाईट आणि…” नेटकऱ्याच्या स्पष्ट प्रतिक्रियेवर विशाखा सुभेदारने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “आमच्या घरी गणपतीला जवळपास १०० मोदक असतात आणि सगळेजण त्यावर ताव मारतात. आम्ही घरीच मोदक करतो. मोदकाच्या ज्या पाकळ्या असतात त्या करण्याच्या भानगडीत पडू नका. त्या चांगल्या आल्या किंवा नाही आल्या याचा काही फरक पडत नाही. शेवटी मोदक उकडल्यावर कसा दिसतो यापेक्षाही तो कसा लागतो याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे सारण उत्तम जमलं आणि पाकळ्या थोड्याशा इकडे तिकडे झाल्या तरीही आपल्या सगळ्यांची भावना इतकी भक्तीमय असते की तो मोदक गोडच लागतो.”

हेही वाचा : “ताई, खूप खूप धन्यवाद…”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम नम्रता संभेरावने मानले विशाखा सुभेदारचे आभार, जाणून घ्या कारण

तर आता त्यांचं हे बोलणं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तर यावर कमेंट करत नेटकरी त्यांचा हा फंडा आवडल्याचं सांगत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vishakha subhedar gave interesting tip to make modak rnv

First published on: 14-09-2023 at 11:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×