“मेकअप करणाऱ्याला…” लूकवरुन ट्रोल करणाऱ्यावर भडकली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब, म्हणाली, “काळजी करु नको कारण…”

ट्रोल करणाऱ्याला शिवाली परबचं उत्तर, काय म्हणाली अभिनेत्री?

shivali parab shivali parab news
ट्रोल करणाऱ्याला शिवाली परबचं उत्तर, काय म्हणाली अभिनेत्री?

छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही हा कार्यक्रम प्रेक्षक आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणारी शिवाली आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

शिवाली सोशल मीडियाद्वारे तिचे विविध फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसते. आताही तिने एका वेगळ्याच लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिवालीने वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिचा लूकही अगदी वेगळाच दिसत आहे. तिने या ड्रेसवर परिधान केलेली ज्वेलरी विशेष लक्षवेधी ठरत आहे. लांब कानातले, नेकपीस शिवालीने घातला आहे.

आणखी वाचा – विलेपार्लेच्या चाळीत राहणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाने २२व्या वर्षी खरेदी केली दुचाकी, म्हणाली…

शिवाली परबचा संताप

तिचा हा लूक पाहून काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींना शिवालीचा लूक आवडला नाही. एका नेटकऱ्याने शिवालीची तिच्या लूकवरुन खिल्ली उडवली. मात्र शिवालीला हे अजिबात पटलं नाही. तिने या नेटकऱ्याला कमेंट करत अगदी चोख उत्तर दिलं. “मेकअप मॅनला अतिस्वातंत्र्य दिल्याचे परिणाम” असं एका नेटकऱ्याने म्हटलं.

आणखी वाचा – तीन अफेअर, विवाहित अभिनेत्याला १० वर्ष केलं डेट पण…; ५२व्या वर्षीही तब्बू आहे अविवाहित, कोणतंच नातं टिकलं नाही कारण…

या कमेंटवर शिवालीने उत्तर दिलं. शिवाली म्हणाली, “माझा मेकअप मीच करते. त्यामुळे काळजी नको”. मेकअपवरुन ट्रोल करणाऱ्याला शिवालीने योग्य ते उत्तर दिलं. तिने शेअर केलेले फोटो हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील आहेत. स्किटमधील एखाद्या पात्रासाठी तिने हा लूक केला असावा असं दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 15:48 IST
Next Story
‘रामायण’चं शूटिंग करताना खूप सिगारेट ओढायचे अरुण गोविल, एके दिवशी चाहत्याने पाहिलं अन्…
Exit mobile version