वनिता खरातने 'या' रिसॉर्टमध्ये केलं लग्न, खर्च केले हजारो रुपये, जेवणाचीच किंमत आहे तब्बल... | maharashtrachi hasyajatra fem actress vanita kharat wedding destination in thane yeoor hills see details | Loksatta

वनिता खरातने ‘या’ रिसॉर्टमध्ये केलं लग्न, खर्च केले हजारो रुपये, जेवणाचीच किंमत आहे तब्बल…

वनिता खरातने लग्नासाठी खर्च केले हजारो रुपये, या ठिकाणी केलं पार पडला विवाहसोहळा

vanita kharat wedding destination vanita kharat
वनिता खरातने लग्नासाठी खर्च केले हजारो रुपये, या ठिकाणी केलं पार पडला विवाहसोहळा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर सप्तपदी घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. मोजक्याच मंडळींच्या उपस्थित वनिताचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. वनिताची जवळची मित्र मंडळीही तिच्या या खास क्षणी उपस्थित होती. तिने लग्नासाठी एका सुंदर ठिकाणाची निवड केली होती.

आणखी वाचा – वीणा जगतापला अजूनही विसरु शकला नाही शिव ठाकरे, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला…”

वनिता व सुमितला त्यांचं लग्न अगदी खास आणि कायम लक्षात राहिल असं हवं होतं. म्हणूनच त्यांनी एका डेस्टिनेशनची निवड केली. ठाण्यातील येऊर हिल्स येथील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. ‘Exotica’ असं या रिसॉर्टचं नाव आहे. निर्सगरम्य असं इथे वातावरण आहे.

या रिसॉर्टमध्ये लग्न करण्यासाठी जवळपास ३० हजारापेक्षा अधिक रुपये भाडं आहे. शिवाय जेवणामध्ये शाकाहारी व मांसाहारी निवड करता येते. वनिता व सुमितने या रिसॉर्टमध्ये लग्न केलं. पण या रिसॉर्टमध्ये एका जेवणाच्या ताटाची किंमत अगदी महाग आहे. शाकाहारी जेवणाचं एक ताट ८५० रुपये तर शाकाहारी व मांसाहारी जेवणाचं एक ताट एक हजार रुपयांच्या घरात आहे.

आणखी वाचा – Photos : “तुम्हाला हे शोभत नाही” कार्यक्रमात असे कपडे परिधान केल्यामुळे अमृता फडणवीस ट्रोल, नव्या ड्रेसिंग स्टाइलची चर्चा

म्हणजेच वनिता व सुमितने त्यांच्या लग्नासाठी हजारो रुपये खर्च केला असल्याचं दिसत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक कलाकारांनी वनिता व सुमितच्या लग्नात हजेरी लावली. वनिताचा नवरा सुमित एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. आधीपासूनच मैत्री असलेल्या वनिता व सुमितच्या नात्याला एका पिकनिकनंतर सुरुवात झाली. आता दोघंही सुखाचा संसार करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 13:14 IST
Next Story
कॅन्सरशी झुंज, उपचारासाठी नाहीत पैसे अन्…; प्रसिद्ध अभिनेत्यासाठी सहकलाकरांनी दिली मदतीची हाक