वीणा जगतापला अजूनही विसरु शकला नाही शिव ठाकरे, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला…”

शिव ठाकरे व वीणा जगतापच्या नात्याची चर्चा, ‘बिग बॉस’च्या घरात शिवचं खासगी आयुष्याबाबत वक्तव्य

Shiv Thakare bigg boss 16
शिव ठाकरे व वीणा जगतापच्या नात्याची चर्चा, 'बिग बॉस'च्या घरात शिवचं खासगी आयुष्याबाबत वक्तव्य

‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत मराठमोळ्या शिव ठाकरे फिनालेपर्यंत येऊन पोहोचला आहे. काही दिवसांमध्येच या शोचा अंतिम सोहळा पार पडले. शिवची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शिवच ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकणार असं त्याचे चाहते म्हणत आहेत. या शोदरम्यान शिवने त्याच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य केलं. आता पुन्हा एकदा त्याने केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

आणखी वाचा – जगभरात ‘पठाण’ने कमावले ७०० कोटी, शाहरुख खाननेच सांगितली खरी आकडेवारी, म्हणाला, “अजूनही…”

शिव त्याच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’मध्ये त्याची मैत्री अभिनेत्री वीणा जगतापशी झाली. या दोघांच्या नात्याला या घरामध्येच सुरुवात झाली. या दोघांच्या ब्रेकअपच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या. पण अजूनही शिवच्या हातावर वीणाचा टॅटू आहे.

अभिनेते अनुपम खेर ‘बिग बॉस’च्या घरामध्ये गेले होते. यावेळी शिवला त्यांनी त्याच्या हातावर असलेल्या वीणाच्या टॅटूबाबत विचारलं. “वीणाला भेटण्यासाठी किती उत्सुक आहेस?” असं अनुपम यांनी शिवला विचारलं. यावेळी तो म्हणाला. “हो मला विणाला भेटायचं आहे”.

आणखी वाचा – Photos : “तुम्हाला हे शोभत नाही” कार्यक्रमात असे कपडे परिधान केल्यामुळे अमृता फडणवीस ट्रोल, नव्या ड्रेसिंग स्टाइलची चर्चा

शिवच्या या उत्तरानंतर पुन्हा एकदा दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिवच्या आईने त्याच्या व वीणाच्या नात्यावर भाष्य केलं होतं. शिव आता कोणत्याच नात्यामध्ये नाही असं शिवची आई म्हणाली होती. शिवाय शिव मी जी मुलगी पसंत करणार त्याच मुलीशी लग्न करणार असंही त्याच्या आईने म्हटलं होत. आता पुन्हा शिव व वीणाचं नातं जुळणार का? हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:03 IST
Next Story
“कशालाच काही अर्थ नाही…” कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
Exit mobile version