सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. रोहितसह रणवीर सिंग व चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनसाठी जोरदार मेहनत करत आहेत. ‘सर्कस’च्या टीमने प्रमोशननिमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्येही हजेरी लावली होती. यावेळी रणवीरसह रोहितबरोबरही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी धमाल-मस्ती केली.

आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणनंतर सनी लिओनीने परिधान केले भगव्या रंगाचे कपडे, समुद्रकिनारी वाळूत लोळली अन्…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे सुप्रसिद्ध विनोदी कलाकार यांनी यादरम्यान रोहित शेट्टीबरोबर एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. या फोटोमध्ये अरुण कदम यांनी डोळे मिटलेले दिसत आहेत. तसेच त्यांनी या फोटोला एक हटके कॅप्शन दिलं आहे.

रोहित शेट्टीबरोबरचा फोटो शेअर करताना अरुण कदम यांनी म्हटलं की, “हा फोटो चुकलेला नसून रोहित सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा धन्य झालो म्हणून डोळे बंद झाले आहेत.” पण या कॅप्शनवरुनच अरुण यांना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – ‘अवतार २’ पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, चित्रपटगृहामध्येच जागेवर कोसळला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसा आणि प्रसिद्धीत धन्यता मानली तर तुम्ही स्वतःला कलाकार म्हणवून घेऊ नका. त्याच्यापेक्षी तुम्ही श्रेष्ठ आहात, मराठी कलाकार स्वतःला कमी का समजतात, कोणाला किती महत्त्व द्यायचं हे नीट ठरवा, आम्ही तुमची थोरवी गायची आणि तुम्ही हिंदी कलाकाराने हात ठेवला की धन्यता मानायची अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.